कुर्ल्यातील मोटार स्पेअर पार्ट्सच्या दुकानाला भीषण आग, पहा व्हिडिओ...

(Image: ANI Twitter/ Video Screenshot)
(Image: ANI Twitter/ Video Screenshot)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

 मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटना वाढल्या आहेत. बुधवारी कुर्ला पश्चिमेकडे कपाडियानगरजवळ मोटार स्पेअर्स पार्ट्सच्या दुकानाला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

कुर्ला पश्चिम इथे बस डेपो रोडवर मोटार स्पेअर्स पार्ट्सचं दुकान आहे. बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही आग लागली. आगीमुळे धुराचे मोठमोठे लोळ पाहायला मिळत होते. आग इतकी भीषण होती की तीन किलोमीटर अंतरावरुनही धुराचे लोळ दिसत होते . 

ही लेव्हल २ ची आग असल्याचं फायर ब्रिगेडकडून सांगण्यात आलं आहे. घटनास्थळी ८ फायर इंजिन, ८ फायर टॅंकर दाखल झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेलं नाही.



हेही वाचा -

  1. परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वरंटाईन सक्तीचं
  1. कोरोनाची लक्षणं नसलेल्यांची प्रतिजन चाचणी होणार नाही
पुढील बातमी
इतर बातम्या