Advertisement

कोरोनाची लक्षणं नसलेल्यांची प्रतिजन चाचणी होणार नाही

रुग्णालयात आलेल्या व लक्षणं नसलेल्या कोणत्याही नागरिकांची प्रतिजन चाचणी महापालिकेच्या परवानगीशिवाय खासगी रुग्णालयांनी करू नये, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

कोरोनाची लक्षणं नसलेल्यांची प्रतिजन चाचणी होणार नाही
SHARES

रुग्णालयात आलेल्या व लक्षणं नसलेल्या कोणत्याही नागरिकांची प्रतिजन चाचणी महापालिकेच्या परवानगीशिवाय खासगी रुग्णालयांनी करू नये, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal singh chahal) यांनी दिले आहेत. तसंच लक्षणं असलेल्या एखाद्या संशयिताची प्रतिजन चाचणी करता येणार आहे. मात्र त्याचा अहवाल आयसीएमआरच्या संकेतस्थळावर नोंदवणं बंधनकारक असेल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

महापालिकेला (bmc) न कळवताच अनेक खासगी रुग्णालये परस्पर प्रतिजन चाचण्या करीत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर चहल यांनी चाचण्यांबाबत नुकतीच नवीन नियमावली जाहीर केली. खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या एखाद्या रुग्णाची प्रतिजन चाचणी केल्यास त्याचा अहवाल काहीही असला तरी तो आयसीएमआरच्या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे. शिवाय, बाधित रुग्णांची यादी महापालिकेला कळवणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

फ्लूसदृश लक्षणे असलेला रुग्ण खासगी रुग्णालयात आला असता रुग्णालयांना त्याची प्रतिजन चाचणी करता येईल. रुग्णालयाकडे खाटा उपलब्ध असतील तर नियंत्रण कक्षाला कळवून त्याला दाखल करता येईल. मात्र रुग्णशय्या नसेल तर त्याला गृह विलगीकरणासाठी पाठवता येईल, असेही या नवीन नियमावलीत म्हटले आहे.

नागरिकांच्या चाचण्यांचे (covid 19) अहवाल येण्यास विलंब होत असल्याचे आढळून आले असून प्रयोगशाळांनी हे अहवाल २४ तासांतच आयसीएमआरच्या संके तस्थळावर नोंदवावेत, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. तसेच महापालिकेला न कळवता नागरिकांना परस्पर अहवाल कळवू नये. नागरिकांना परस्पर अहवाल दिल्यामुळे रुग्णशय्या व्यवस्थापन बिघडत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रयोगशाळांकडे दुपारी दोन वाजेपर्यंत आलेल्या नमुन्यांचे अहवाल त्याच दिवशी देण्यात यावेत. त्यानंतर आलेल्या नमुन्यांचे अहवाल दुसऱ्या दिवशी २४ तासांत द्यावेत.

नागरिकांचे नमुने घरी जाऊन गोळा करायचे असल्यास लक्षणे असलेल्या संशयितांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या नियमांचे पालन न करणाऱ्या प्रयोगशाळांचा परवाना रद्द करण्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे.



हेही वाचा -

गोरेगाव, वांद्रे आणि चेंबूरमध्ये ७ दिवसात सापडले सर्वाधिक कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात ८१ लाखापेक्षा अधिकांना कोरोना लसीचा पहिला डोस, केंद्राकडून कौतुक


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा