हँकॉक पुलासाठी रहिवाशांची सह्यांची मोहीम

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कुठलीही पर्यायी व्यवस्था न देता सॅण्डहर्स्ट रोड आणि डोंगरीला जोडणारा हँकॉक पूल रेल्वेकडून पाडण्यात आला. धोकादायक असल्याचं सांगत रेल्वेने बेकायदेशीररित्या हा पूल तोडला. यामुळे रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत असल्यानं, हा पूल लवकरात लवकर बांधावा, या मागणीसाठी माझगाव परिसरात रविवारी सह्यांची मोहीम राबवण्यात आली.

२२ नोव्हेंबरचा अल्टिमेटम तरी

माझगाव परिसरात राबवण्यात आलेल्या सह्याच्या मोहिमेत जवळपास २ हजार ५०० रहिवाशांनी सहभाग घेतला. या पुलासाठी उच्च न्यायालयाने शुक्रवारी रेल्वे प्रशासनासह मुंबई महापालिकेची कानउघडणी केली. शिवाय, यासाठी २२ नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. पण, अजूनही रेल्वेप्रशासनाने यासाठी काहीच पावले उचलली नाही आहेत. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांनी सही मोहीम राबवत प्रशासनाचा निषेध केला.

हा पूल लवकरात लवकर बांधावा यासाठी उच्च न्यायालयात रेल्वे प्रशासनाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवाय हा पूल का तोडला? याचं कारणही विचारण्यात आलं आहे. प्रशासनाला तत्काळ जाग यावी यासाठी आम्ही सह्यांची मोहीम राबवली. ज्यात २ हजार ५०० रहिवाशांनी पुढाकार घेतला.

- कमलाकर शेणॉय, याचिकाकर्ते


हेही वाचा-

हँकॉक पूल कसा बांधणार? रेल्वेला उच्च न्यायालयाचा अल्टिमेटम

एल्फिन्स्टनचं झालं...हँकॉकचं काय?


पुढील बातमी
इतर बातम्या