मेट्रो कार शेडची जागा निश्चित करण्यासाठी सहा सदस्यीय समिती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्य सरकारने मेट्रो कार शेडची जागा निश्चित करण्यासाठी सहा सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. मुख्य सचिव संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असेल. 

ही समिती मुंबई मेट्रो मार्गिका तीन, चार आणि सहा या तीन मेट्रो मार्गीकांचा एकत्रित कार डेपो करण्यासाठी अभ्यास करेल. समिती एका महिन्यात राज्य सरकारला आपला अहवाल सादर करणार आहे.

 आरे येथील यापूर्वी मेट्रो ३ कारशेड डेपोसाठी प्रस्तावित केलेला आराखडा पुरेसा आहे किंवा आणखी जमीन किंवा आणखी वृक्ष तोड करण्याची आवश्यकता भासेल का याबाबत समिती तपासणी करणार आहे. याशिवाय मेट्रो तीन व सहा यांच्या मार्गीकेचं एकत्रीकरण सुलभरीत्या करणं शक्य आहे का आणि यासाठी अंदाजित खर्च व कालावधी किती याचीही तपासणी करणार आहे. 

मेट्रो कार शेडचा अभ्यास करणारी ही समिती कांजूरमार्ग येथील जागा आरेपेक्षा सुयोग्य आहे का? याचीही तपासणी करेल. मेट्रो ३, ४ आणि ६ यांच्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथे जागा पुरेशी आणि सुयोग्य आहे का याचाही यात समावेश असेल.


हेही वाचा -

'या' भागांत पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज

आमदार सरनाईक यांना ‘ईडी’चे पून्हा समन्स


पुढील बातमी
इतर बातम्या