आमदार सरनाईक यांना ‘ईडी’चे पुन्हा समन्स


आमदार सरनाईक यांना ‘ईडी’चे पुन्हा समन्स
SHARES

टॉप्स ग्रुप(सिक्युरीटी) कंपनीच्या कथीत आर्थिक गैरव्यवहारांबाबत तपास करणाऱ्या सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना पून्हा चौकशीला हजर राहण्याबाबत समन्स जारी केला होता. मात्र प्रकृती ठिक नसल्याचं कारण देत सरनाईक यांनी चौकशीला येण टाळल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचाः- बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियममध्ये ५० टक्के सवलत

गेल्या आठवडय़ात सरनाईक यांचे निवासस्थान, कार्यालयात ईडीने छापे घालून शोधाशोध के ली होती. तसेच त्यांचे पुत्र विहंग यांना विभागीय कार्यालयात आणून चौकशीही के ली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर सरनाईक सध्या विलगीकरणात होते. ईडी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरनाईक यांना समन्स जारी करून बुधवारी चौकशीस बोलावले होते. मात्र प्रकृती ठिक नसल्याचं कारण पुढे करत, सरनाईक यांनी चौकशीला हजर न राहण्याबाबतचं पत्र वकिलांमार्फत ईडीला दिलं आहे.  आतापर्यंत ईडीने सरनाईक आणि टॉप्स ग्रुपचे प्रमुख राहुल नंदा यांच्याशी संबंधीत अमित चांदोले या व्यक्तीला अटक के ली. टॉप्स ग्रुप कंपनीने एमएमआरडीएला सुरक्षारक्षक पुरविण्याच्या करारात घोटाळा के ला. या घोटाळ्यातील निम्मा वाटा किं वा नफा सरनाईक यांना मिळाला, अशी माहिती चांदोले याने चौकशीदरम्यान दिल्याचा दावा ईडीने के ला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा