मुंबईच्या पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त किनारपट्टीची पाहणी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी तौंते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मुंबईतील विविध किनारपट्टी ठिकाणांना भेट दिली. यावेळी त्यांनी मालाड-मढ, खारदांडा, माहीम व कुलाबा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व मच्छिमार बांधवांना दिलासा दिला.

सोमवारी अरबी समुद्रात उसळलेल्या तौंते चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमारांचं फार नुकसान झालेलं आहे. या नुकसानग्रस्त भागाची अस्लम शेख यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली.

यावेळी अस्लम शेख म्हणाले की, या चक्रीवादळामुळे मच्छीमार नौका, जाळी व किनारपट्टीनजीकची घरे यांचं नुकसान झालं आहे. हवामान खात्याकडून तोक्ते वादळाची पूर्वसूचना मिळाल्यानंतर मच्छीमारांनी आपल्या नौका नांगरुन ठेवल्या होत्या. तरीही वादळाच्या तीव्रतेमुळे बोटींचं नुकसान झालं. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मदत जाहीर करण्यात येईल.

यावेळी त्यांच्यासोबत आमदार भाई जगताप, मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, सह सचिव राजेंद्र जाधव, प्रादेशिक उपायुक्त कोकण विभाग देवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा- वांद्रे-वरळी सी लिंक वाहतुकीसाठी खुला

सोमवारचा दिवस हा मुंबईसाठी (mumbai) मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस ठरला. सोमवारी मुंबईला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. मुंबईत सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी १९४ मिमी पाऊस झाला. तर सरासरी १०८ किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने केली.

आतापर्यंत मे महिन्यातील पावसाची सर्वाधिक नोंद ही १९ मे २००० रोजी करण्यात आली होती. या दिवशी सरासरी १९०.८ मिमी पाऊस झाला होता. मात्र हा विक्रम तौंतेच्या परिणामांमुळे मोडीत निघाला.

हेही वाचा- Cyclone Tauktae: बीकेसी जम्बो कोविड सेंटरचं मोठं नुकसान नाही

पुढील बातमी
इतर बातम्या