Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

Cyclone Tauktae: बीकेसी जम्बो कोविड सेंटरचं मोठं नुकसान नाही

चक्रीवादळाचा वांद्रे कुर्ला संकुलातील जम्बो कोविड सेंटरलाही तडाखा बसला. मात्र वेळीच घेण्यात आलेल्या सावधगिरीमुळे सेंटरचं फारसं नुकसान झालं नाही.

Cyclone Tauktae: बीकेसी जम्बो कोविड सेंटरचं मोठं नुकसान नाही
SHARES

तौंते चक्रीवादळाने सोमवारी मुंबईला आपलं रौद्र रूप दाखवलं. मुसळधार पावसासोबतच सोसायट्याच्या वाऱ्याने संपूर्ण दिवसभर मुंबईला अक्षरश: झोडपून काढलं. या चक्रीवादळाचा वांद्रे कुर्ला संकुलातील जम्बो कोविड सेंटरलाही तडाखा बसला. मात्र वेळीच घेण्यात आलेल्या सावधगिरीमुळे सेंटरचं फारसं नुकसान झालं नाही. 

अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या आणि गुजरातकडे मार्गक्रमण करणाऱ्या तौंते चक्रीवादळाने मुंबईच्या समुद्र किनाऱ्यानजीक येताच अतिरौद्रवतार घेतला. या चक्रीवादळामुळे मुंबईत मुसळधार पाऊस आणि जोडीला वादळी वारा सुरू झाला. शहर आणि उपनगरात चारशेहून अधिक ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या पडून अनेक गाड्यांचं नुकसान झालं. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी बीकेसी इथं उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरलाही तौंते चक्रीवादळाचा तडाखा बसला. जोरदार वाऱ्यामुळे कोविड सेंटरचे काही ठिकाणचे पत्रे निघाले, तर काही ठिकाणी ताडपत्री निघाली आहे. सुदैवाने खबरदारी घेत याठिकाणच्या सर्व रुग्णांना आधीच इतर ठिकाणी हलवण्यात आलं होतं.

हेही वाचा- "तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?"

बीकेसीतील जम्बो कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या १९३ रुग्णांना ज्यामध्ये आयसीयूतील ७३ रुग्णांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांना महापालिकेच्या इतर रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसेचे नवाब मलिक यांनी दिली होती.

यानंतर मंगळवारी पहाटे ५ वाजता डीन डॉ. राजेश डेरे यांनी कोविड सेंटरची पूर्ण पहाणी केली. वेळीच घेतलेल्या खबरदारीमुळे तौंते चक्रीवादळात BKC जम्बो कोविड सेंटरचं कुठलंही मोठं नुकसान झालं नाही. MCGM च्या मार्गदर्शनाखाली लवकरच आपण पुन्हा रुग्ण सेवा सुरू करू, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

(BKC Jumbo Covid Center did not suffer any major damage during the cyclone tauktae says bmc)

हेही वाचा- वांद्रे-वरळी सी लिंक वाहतुकीसाठी खुला


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा