Advertisement

"तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?"

वरळीतील वस्त्यांमध्ये किमान गुडघाभर पाणी साचलं होतं. संपूर्ण मुंबईत हीच परिस्थिती दिसून येत होती. मान्सून सुरू व्हायच्या आधीच हे चित्र असल्याने भाजपचे नेते निलेश राणे यांनी यावरून वरळीच्या आमदारांवर निशाणा साधला आहे.

"तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?"
SHARES

तौंते चक्रीवादळाने मुंबईला (mumbai) सोमवारी जोरदार तडाखा दिला. एकाबाजूला मुसळधार कोसळणारा पाऊस, तर दुसऱ्या बाजूला सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जागोजागी झाडं उन्मळून पडत होती. ठिकठिकाणी पाणी तुंबलं होतं. वरळीतील वस्त्यांमध्ये किमान गुडघाभर पाणी साचलं होतं. संपूर्ण मुंबईत हीच परिस्थिती दिसून येत होती. मान्सून सुरू व्हायच्या आधीच हे चित्र असल्याने भाजपचे नेते निलेश राणे यांनी यावरून वरळीच्या आमदारांवर निशाणा साधला आहे.

मुसधार पावसामुळे वरळीतील वस्त्यांमध्ये पाणी साचलं होतं. बहुतेक जणांच्या घरात पाणी घुसल्याने घरातील सामानाचं नुकसान झालं. लोकं हातात छत्री घेऊन गुडघारभर पाण्यातून वाट काढून जात होते. असा एक व्हिडिओ निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर अपलोड केला आहे. 

त्यासंदर्भात उद्देशून लिहिताना, हे चित्र वरळी मतदार संघाचं आहे... वरळीकर विचारतायत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे??? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली??? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही, असं म्हणत निलेश राणे यांनी वरळीचे आमदार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) तसंच मुंबई महापालिकेच्या कामावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.

हेही वाचा- लसींसाठी बीएमसीच्या जागतिक निविदेला प्रतिसाद नाही

याआधी भाजपचे आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी देखील मुंबई महापलिकेतील सत्ताधारी आणि कंत्राटदारांना लक्ष्य केलं. मुंबईत दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी कंत्राटदारांमार्फत मान्सूनपूर्व सफाईची कामे केली जातात. नालेसफाई, गटारांची सफाई केली जाते. ही कामे होऊन देखील तौंते चक्रीवादळामुळे आलेल्या पावसाने या कामांची पोलखोल केली. या सगळ्या कामांचं उत्तर कंत्राटदार आणि सत्ताधारी शिवसेनेला द्यावंच लागेल, असं आशिष शेलार म्हणाले.

दरम्यान, सोमवारचा दिवस हा मुंबईसाठी मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस ठरला. सोमवारी मुंबईला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. मुंबईत सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी १९४ मिमी पाऊस झाला. तर सरासरी १०८ किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने केली.

आतापर्यंत मे महिन्यातील पावसाची सर्वाधिक नोंद ही १९ मे २००० रोजी करण्यात आली होती. या दिवशी सरासरी १९०.८ मिमी पाऊस झाला होता. मात्र हा विक्रम तौंतेच्या परिणामांमुळे मोडीत निघाला.

(bjp leader nilesh rane criticized aaditya thackeray and bmc on waterlogging in worli)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा