लवकरच मुंबईकरांना घेता येणार बर्गर, फ्राईज आनंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यात मिशन बिगिन अगेनला सुरवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटापासून बंद असलेली दुकानं आता पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. परंतु दुकानं सुरू झाली असली तरी, राज्याचं आर्थिक चक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी अटी व शर्थींवर आता दुकानं आणि उद्योग सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे.

मुंबईतील उद्योग देखील १० टक्के कर्मचाऱ्यांवर सुरु होतायत. रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये लोकं मोठ्या प्रमाणात जातात आणि त्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. म्हणूनच रेस्टॉरंट, हॉटेल हे बंद ठेवण्यात आलेत. मात्र आता ८ पासून अटी आणि शर्थीने रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

नव्या नियमांप्रमाणे ८ जूनपासून देशभरात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु होणार आहेत. मुंबई आणि पुण्यात मात्र राज्य सरकारच्या नियमावलीप्रमाणे केवळ होम डिलिव्हरीला मान्यता देण्यात आली आहे. मात्र अनेक दिवसांपासून हॉटेलमधील जेवण खाणाऱ्यांसाठी ही देखील मोठी आनंदाची बाब आहे. आता घरच्या घरी तुम्हाला हॉटेलातील जेवण मागवता येणार आहे.

मुंबईत अनेकांना फास्ट फूड मोठ्या प्रमाणात खायला आवडत असतं. त्यांच्या आवडत्या पिझ्झा, बर्गर यासारख्या डिश घरपोच मिळू शकणार आहेत.  मॅकडोनाल्डनं देखील ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मॅकडोनाल्ड आपली दुकानं पुन्हा सुरु करणार असून, फ्राईज आणि बर्गर्स मिळू शकणार आहेत. ज्या भागांमध्ये रेस्टॉरंट  सुरु करण्याची परवानगी आहे तिथे कर्मचाऱ्यांसोबत आता ग्राहकांचं थर्मल चेकिंग केलं जाणार आहे. कोरोनानंतरच्या काळात आता मॅकडोनाल्डमध्ये अधिक स्वच्छता त्याचसोबत फिजिकल डिस्टन्सिंग चे नियम पाळून आसन व्यवस्था करण्यात येणार आहे.


हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचे २३ हजार ४०५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

'ही' आहे ठाण्यातील कंटेनमेंट झोनची यादी


पुढील बातमी
इतर बातम्या