Advertisement

मुंबईत कोरोनाचे २३ हजार ४०५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

मुंबईत गुरूवारी कोरोनाचे १४४२ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ४४ हजार ७०४ झाली आहे.

मुंबईत कोरोनाचे २३ हजार ४०५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
SHARES

मुंबईत गुरूवारी कोरोनाचे १४४२ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ४४ हजार ७०४ झाली आहे. गुरुवारी ४८ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या एक हजार ४६५ झाली आहे. मुंबईत सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २३,४०५ आहे. म्हणजे इतके रुग्ण उपचार घेत आहेत.

मुंबईत धारावीत सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. मात्र, उपचार घेत असलेल्यारुग्णांची संख्या शीव, वडाळा, कुर्ला, भायखळा आणि अंधेरी परिसरात अधिक आहे. मुंबईतील रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक आहे.

दादर, माहीम, धारावी हा भाग असलेल्या जी उत्तर भागात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. त्याखालोखाल कुर्ला, शीव-वडाळा, भायखळा, अंधेरी पश्चिमचा भाग, वांद्रे पूर्व, लालबाग-परळ यांचा क्रमांक लागतो. मात्र मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. काही भागात मात्र कोरोनामुक्तीचा दर कमी असल्यामुळे प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

विभागानुसार रुग्णांची संख्या

एच पूर्व – वांद्रे पूर्व -  ११४८ 

 के पश्चिम – अंधेरी, विलेपार्ले पश्चिम  -१२७३

 के पूर्व – अंधेरी, विलेपार्ले पूर्व -१४१६

एल – कुर्ला -१४८८ 

ई – भायखळा, नागपाडा, मुंबई सेंट्रल -१४५५ 

 एफ दक्षिण -परळ,  लालबाग, शिवडी -१४०९

एस – भांडुप, विक्रोळी -१२७६ 

एन – घाटकोपर, विद्याविहार -१२३०

 एफ उत्तर – शीव, वडाळा, अ‍ॅण्टॉप हिल - १५०४



हेही वाचा -

महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या नियमांत पुन्हा बदल, मिळाली एमएमआरमध्ये प्रवासाला मुभा

'मिशन बिगीन अगेन'द्वारे नातेवाइकांसाठी सोसायट्यांचे दार उघडे




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा