Advertisement

'मिशन बिगीन अगेन'द्वारे नातेवाइकांसाठी सोसायट्यांचे दार उघडे


'मिशन बिगीन अगेन'द्वारे नातेवाइकांसाठी सोसायट्यांचे दार उघडे
SHARES

चीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मुंबईत वाढल्यानंतर महापालिकेकडून कडक नियम मुंबईकरांना लागू करण्यात आले होते. मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षेसाठी नातेवाईकांसह कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या सोसायटी, इमारत, चाळमध्ये प्रवेश देण्यास नकार दिला. केवळ सोसायटीमधील रहिवाशांनाच आत-बाहेर करण्याची मुभा देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मागील अडीच महिने मुंबईत सुरू असलेलं लॉकडाऊन अखेर शिथिल करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबईतील व्यवहार टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यात येत आहेत.

शुक्रवारपासून अनलॉकडाऊन १.० ला सुरूवात झाली आहे. यामध्ये अनेक सुविधा सुरू करण्यात आली आहे. परंतु, या ‘मिशन बिगीन अगेन’मध्ये काही नियमांबाबत स्पष्टता नसल्यानं गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळं काही सोसायट्यांचे द्वार आता घरकाम करणाऱ्या महिला, परराज्यातून आलेले नातेवाईक, घरातील छोट्या-मोठ्या दुरुस्तीसाठी खुले करण्यात आले आहे.

हेही वाचा - कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी-अधिक दाखवून फायदा नाही, फडणवीसांचा गंभीर आरोप

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबईतील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांनी प्रवेश बंदी लागू केली. दररोज येणारा दूध विक्रेता, वृत्तपत्र, सेल्समन, घरकाम करणाऱ्या महिलांना प्रवेश नाकारण्यात आला. एवढेच नव्हे तर सोसायट्यांमधील सदस्यांना पूर्वपरवानगीशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. तर अनेक सोसायट्यांनी केवळ अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे, असे नियम केले. या नियमांचे काटेकोरपणे पालन झाल्यामुळे कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात नियंत्रणात आणणे शक्य झाले.

हेही वाचा - महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या नियमांत पुन्हा बदल, मिळाली एमएमआरमध्ये प्रवासाला मुभा

‘मिशन बिगीन अगेन’द्वारे सूट मिळाल्यानंतर काही सोसायट्यांनी आता प्लंबर, वृत्तपत्र विक्रेते, इलेक्ट्रिशियन तर काही ठिकाणी पार्सल सेवाही सुरू केली आहे. घरकाम करणाऱ्या महिला, भाडेकरूंचे स्थलांतर, घराचं नूतनीकरण अशा काही बाबी नवीन नियमावलीत स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत. तरीही काही सोसायट्यांनी सावधगिरी बाळगत घरकाम करणाऱ्या महिला, दुसऱ्या राज्यात अडकलेले आप्तेष्टांना प्रवेश देण्यास सुरुवात केली असल्याचं दिसून येत आहे.



हेही वाचा -

राज्यात अनलॉकडाऊन १.० ला शुक्रवारपासून सुरूवात

लॉकडाऊनमुळं मुंबई लोकलला 'इतक्या' कोटींचा तोटा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा