Advertisement

राज्यात अनलॉकडाऊन १.० ला शुक्रवारपासून सुरूवात

राज्यात सरकारच्या ‘मिशन बिगिन अगेन’ धोरणानुसार शुक्रवारपासून अनलॉकडाउन १.० ला सुरुवात होत आहे.

राज्यात अनलॉकडाऊन १.० ला शुक्रवारपासून सुरूवात
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळं मागील २ महिने मुंबईतील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली होती. अत्यावश्यक सेवा वगळता व नव्या नियमांनुसार दुकानं सुरू होती. परंतु, आता राज्यात सरकारच्या ‘मिशन बिगिन अगेन’ धोरणानुसार  शुक्रवारपासून अनलॉकडाउन १.० ला सुरुवात होत आहे. मागच्या २ महिन्यांपासून कठोर निर्बंध असलेल्या मुंबईत काही गोष्टी सुरु होणार आहेत.

बाजारपेठा, दुकानं सुरु होणार असली तरी तिथे आता आपल्याला पुर्वीसारखी गर्दी करता येणार नाही. काही गोष्टींचे आपल्याला पालन करावे लागले.

नियम व अटी

 • मुंबई शहर आणि शेजारच्या महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत प्रवासासाठी परवानगीची अट काढून घेण्यात आली आहे. 
 • मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईँदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ येथे नागरिकांना आता विनापरवानगी प्रवास करता येणार आहे.
 • पहाटे ५ ते रात्री ७ या वेळेत नागरिकांसाठी उद्यानं, मैदानं खुली करण्यात आली आहेत. 
 • यावेळेत नागरिक व्यायाम, जॉगिंग, सायकल चालवू शकतात. मात्र यावेळी व्यायामाचं कोणतंही साहित्य, गार्डनमधील जीम, ओपन एअर जीम वापरता येणार नाही.
 • दुकान सम-विषम नियमाने पूर्ण दिवस सुरु ठेवण्याची परवानगी. 
 • एका दिवशी रस्त्याच्या एकाच बाजूची दुकानं सुरु राहतील. 
 • नियमांचं पालन होईल यासाठी पोलीस आणि महापालिका आयुक्तांनी मार्केट तसंच दुकानं मालक असोसिएशनला चर्चेत सहभागी करुन घ्यावे. 
 • यावेळी वाहतूक व्यवस्था आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन महत्त्वाचं असेल.
 • कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम वापरण्याची परवानगी नसेल. 
 • कोणत्याही प्रकारच्या कपडे एक्स्चेंज किंवा रिटर्न करू देण्याचीही परवानगी नसेल.
 • रविवारपासून म्हणजेच ७ जून २०२० पासून वृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 
 • यावेळी स्वच्छतेच्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.
 • शैक्षणिक संस्थांचे (शाळा/कॉलेज/विद्यापीठ) कर्मचारी विद्यार्थ्यांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी कामकाज सुरु ठेऊ शकतात. 
 • ई-कंटेट विकसित करणे, उत्तर पत्रिकांचं मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्याची काम करु शकतात.हेही वाचा -

कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी-अधिक दाखवून फायदा नाही, फडणवीसांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या नियमांत पुन्हा बदल, मिळाली एमएमआरमध्ये प्रवासाला मुभासंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा