Advertisement

महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या नियमांत पुन्हा बदल, मिळाली एमएमआरमध्ये प्रवासाला मुभा

महाराष्ट्र राज्य सरकारने लॉकडाऊनच्या नियमावलीत पुन्हा बदल केले आहेत. ही बदललेली नियमावली सरकारने नुकतीच जारी केली आहे. या नव्या नियमावलीनुसार मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमध्ये (MMR) प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या नियमांत पुन्हा बदल, मिळाली एमएमआरमध्ये प्रवासाला मुभा
SHARES

महाराष्ट्र राज्य सरकारने लॉकडाऊनच्या नियमावलीत पुन्हा बदल केले आहेत. ही बदललेली नियमावली (coronavirus live updates maharashtra government revised lockdown 5 guidelines and allows inter district travel in mmr region) सरकारने नुकतीच जारी केली आहे. या नव्या नियमावलीनुसार मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमध्ये (MMR) प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तसंच राज्यातील खासगी कार्यालय ८ जून पासून पुन्हा सुरू करण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे. म्हणजेच आता कुठल्याही व्यक्तीला मुंबई शहर-उपनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर,वसई-विरार, नवी मुंबई-पनवेल अशा महानगर परिसरात प्रवास करून कार्यालयात जाणं शक्य होणार आहे.

पाचव्या टप्प्यातील लाॅकडाऊनची घोषणा करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिशन बिगीन अगेन सुरू करत असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार राज्यातील लाॅकडाऊनचे निर्बंध ३ टप्प्यांमध्ये शिथिल करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यातील दुसरा टप्पा ५ जूनपासून सुरू होत आहे. याआधी लाॅकडाऊनच्या नियमांनुसार जिल्हांतर्गत प्रवासाला बंदी घालण्यात आली होती. ती बंदी हटवून मुंबई महानगर प्रदेशात प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

हेही वाचा- Lockdown 5.0: महाराष्ट्र सरकारची नियमावली जाहीर, तुम्हाला वाचायलाच हवी...

 

८ जूनपासून खासगी कार्यालये १० टक्के मनुष्यबळांसह सुरू होऊ शकतील. या कर्मचाऱ्यांना आपापल्या कार्यालयांत पोहोचण्यासाठी जिल्हांतर्गत प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. तर इतर कर्मचारी घरून काम करतील. ऑफिसमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग, थर्मल स्क्रिनिंग, मास्क, सॅनिटायझर इ. बाबतच्या नियमांचं पालन करणं गरजेचं ठरणार आहे.  

टॅक्सी, कॅब, आॅटो रिक्षा यांना ड्रायव्हर अधिक दोन प्रवासी तसंच दुचाकीवर एकटा चालक यांना देखील प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा देखील सुरळीत होऊ शकणार आहे.

सकाळी ५ ते संध्याकाळी ७ यावेळेत सायकलिंग, जॉगिंगसाठी परवानगी असेल. याशिवाय मोकळ्या मैदानांत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत व्यायाम करता येईल, परंतु ओपन जिममधील कोणतीही उपकरणं वापरता येणार नाहीत.

शाॅपिंग माॅल, काॅम्प्लेक्स वगळता इतर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु सम आणि विषम पद्धतीने एका दिवशी रस्त्याच्या एकाच बाजूची दुकाने उघडण्यास परवानगी असेल. तर दुसऱ्या दिवशी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूची दुकाने उघडतील. दुकानांत ट्रायल रुमला परवानगी नसेल. नागरिकांचा गोंधळ होऊ नये यासाठी महापालिकेकडून दुकानांच्या वेळा ठरवून देण्यात येतील.

शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी विद्यार्थ्यांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी कामकाज सुरु ठेऊ शकतात. ई-कंटेट विकसित करणं, उत्तर पत्रिकांचं मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्याची काम करु शकतील.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा