एमएमआरडीए हटवणार २१ पुलांवरील जाहिरातींचे होर्डिंग्ज

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पादचारी पूल दुर्घटनेनंतर महापालिकेसोबतच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) देखील सतर्क झाली आहे. आपल्या अखत्यारीतील पुलांच्या सुरक्षेसाठी एमएमआरडीएने आता पुलांवर लावलेले जाहिरातींचे बोर्ड आणि होर्डिंग्ज हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुलांवरील भार हलका होऊन पुलांचं आयुष्य वाढेल, असं एमएमआरडीएचं म्हणणं आहे.      

 

पुलांची डागडुजी

एमएमआरडीएचे आयुक्त यांनी दिलेल्या आदेशानुसार, पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर असलेल्या २१ फूट ओव्हर ब्रिज (FOB)वरील जाहिरातींचे बोर्ड काढून टाकण्यात येणार आहेत. याचसोबत एमएमआरडीए या २१ पुलांची डागडुजीही करुन त्यांना मजबूत करणार आहे. त्याचसोबत या पुलांखाली बागा देखील फुलवण्यात येणार आहेत. 

सर्वेक्षण सुरू

सद्यस्थितीत पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ८ पादचारी पुलांचं सर्वेक्षण वीर जिजामाता टेक्नाॅलाॅजी इन्स्टिट्यूट (VJTI)कडून करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ पूर्व द्रुतगती महामार्गावरील १३ पादचारी पुलांचं देखील सर्वेक्षण करण्यात येईल. 


हेही वाचा-

मुंबई विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत

तर, उद्धव मातोश्री सोडून गेले असते, राणेंच्या आत्मचरित्रातला गौप्यस्फोट


पुढील बातमी
इतर बातम्या