तर, उद्धव मातोश्री सोडून गेले असते, राणेंच्या आत्मचरित्रातला गौप्यस्फोट

राणे यांचं आत्मचरित्र प्रकाशित होण्यापूर्वीच त्यातील काही पानं प्रसारमाध्यमांच्या हाती लागल्याने राणेंच्या आत्मचरित्रातील वादग्रस्त प्रकरणं एक एक करून बाहेर येत आहेत. या आत्मचरित्रात राणे यांनी प्रामुख्याने शिवसेना सोडण्यामागची कारणे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच शिवसेनेतील इतर ज्येष्ठ नेत्यांवर जहरी टीका केली आहे.

SHARE

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांच्या 'नो होल्ड्स बार्ड' (No Holds Barred) या आत्मचरित्राची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. राणे यांचं आत्मचरित्र प्रकाशित होण्यापूर्वीच त्यातील काही पानं प्रसारमाध्यमांच्या हाती लागल्याने राणेंच्या आत्मचरित्रातील वादग्रस्त प्रकरणं एक एक करून बाहेर येत आहेत. या आत्मचरित्रात राणे यांनी प्रामुख्याने शिवसेना सोडण्यामागची कारणे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच शिवसेनेतील इतर ज्येष्ठ नेत्यांवर जहरी टीका केली आहे. राणे यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या आत्मचरित्रात राणे यांनी केलेल्या दाव्यांवर एक नजर टाकूया.   

 

मातोश्री सोडण्याची धमकी

मला शिवसेनेतून काढून टाका, अशी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडे मागणी केल्यानंतर मी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मला फोन करून राजीनामा मागे घेण्याविषयी विचार करण्यास सांगितलं. ही गोष्ट उद्धव ठाकरे यांना कळाल्यावर त्यांनी राणे यांना पक्षात परत घेतल्यास मी आणि रश्मी मातोश्री सोडून जाऊ अशी धमकी बाळासाहेबांना दिली होती. असं असलं, तरी उद्धव ठाकरे हे काही माझे दुश्मन नाहीत, आमच्यात केवळ वैचारिक मतभेद असल्याचं राणेंनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलं आहे.

 

मनोहर जोशींवर निशाणा

या आत्मचरित्रात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे. जोशी यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवून मला मुख्यमंत्री म्हणून नेमण्यात आल्याने त्यांच्या मनात माझ्याबद्दल राग होता. त्यातूनच त्यांनी माझ्याविरोधात उद्धव ठाकरेंचे कान भरले, असा दावाही या आत्मचरित्रात करण्यात आला आहे.


 राजकीय प्रवास

या आत्मचरित्रात नारायण राणे यांनी एक शिवसैनिक, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असा केलेला प्रवास. तसंच मतभेदानंतर शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेस पक्षातील प्रवेश तसंच काही काळाने काँग्रेस सोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची केलेली स्थापना याचा आढावा घेण्यात आला आहे.हेही वाचा-

गटातटाचं राजकारण खपवून घेणार नाही- मिलिंद देवरा

५० टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळलीसंबंधित विषय
ताज्या बातम्या