राज ठाकरे यांची 'मी हाय कोळी'ला भेट

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच ठाण्यातील 'मी हाय कोळी' या उपहारगृहाला भेट दिली. ठाण्यातील एक कार्यक्रम आटोपून राज यांनी तेथील नावाजलेले उपहारगृह असलेल्या 'मी हाय कोळी'ला सदीच्छा भेट दिली.

यावेळी 'मी हाय कोळीचे' संचालक भावेश कोळींनी त्यांचे जंगी स्वागत केले. विशेषत: मासे आणि मांसाहार प्रेमींसाठी एक प्रमुख आकर्षण म्हणून मी हाय कोळीची ओळख आहे. एका मराठी तरुणाने अल्पावधीत उपहारगृह उद्योगात मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. हे कौतुक करण्यासाठी राज ठाकरेंनी खास 'मी हाय कोळीला' भेट दिली. बोटीच्या आकारात छापलेले मेन्यू कार्ड राज ठाकरेंना विशेष भावले. दरम्यान भोजनासाठी आलेल्या उपहारगृहातील इतर ग्राहकांनी देखील राज ठाकरे यांच्याशी हस्तांदोलन केले.

यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे, मनसे नेते संदीप देशपांडे, अभिजीत पानसे आदी मान्यवर उपस्थित होते.


हेही वाचा - 

यापुढे गटबाजीचे राजकारण नको - राज ठाकरे


पुढील बातमी
इतर बातम्या