Advertisement

आसामच्या महिलांनी घेतली राज ठाकरेंची भेट


आसामच्या महिलांनी घेतली राज ठाकरेंची भेट
SHARES

आसाममध्ये भूमिपूत्र आणि प्रादेशिक भाषेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या 'स्वाधीन नारी शक्ती'च्या महिलांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी कृष्ण कुंज या निवासस्थानी भेट घेतली.



राज यांना बांधल्या राख्या

महाराष्ट्रात ज्याप्रकारे तुम्ही भूमिपुत्रांच्या बाजूने आवाज उठवला. तशाच प्रकारचे मार्गदर्शन आसाममध्ये येऊन केल्यास आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. भाजपा सत्तेत आल्यापासून प्रादेशिक भाषांवर अन्याय होत आहे. 2021 पर्यंत भाजपा सत्तेत राहिल्यास आसामची प्रादेशिक भाषा संपून जाईल, अशी व्यथा मांडतानाच 'नारी शक्ती'च्या महिलांनी राज ठाकरे यांना राख्याही बांधल्या.


प्रतिनिधी पाठवणार

या महिलांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर आपला प्रतिनिधी पाठवून तिथली परिस्थिती जाणून घेऊ, असे आश्वासन राज ठाकरे यांनी यावेळी महिलांना दिले.


आम्ही दोन वर्षांपासून भूमिपुत्रांच्या हक्कासाठी काम करतोय. आसाम सरकार एक इव्हेंट कंपनी असल्यासारखी वागत आहे. राज ठाकरे यांनी आसाममध्ये यावे आणि आसाममधील भूमिपुत्रांना आवाज द्यावा. आसाम राज ठाकरेंची वाट बघत आहे.
- मोसमी प्रभाग बराक, स्वाधीन नारी शक्ती

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा