पेटीएमची सेवा आता 10 प्रादेशिक भाषांमध्ये

 Pali Hill
पेटीएमची सेवा आता 10 प्रादेशिक भाषांमध्ये

मुंबई - पेटीएमची सेवा आता मराठी सह 10 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, गुजराती, बंगाली, कन्नड, मल्याळम, ओडिसा आणि पंजाबी, या प्रादेशिक भाषांचा इंटरफेस प्रस्तुत करणारा पेटीएम हा भारताचा पहिला मोबाइल पेमेंट आणि वाणिज्य मंच आहे. याचा फायदा भारतातील 100 मिलियन पेक्षा अधिक अशा स्मार्टफोनधारकांना होईल. यासंदर्भात पेटीएमचे उपाध्यक्ष दीपक ऍबट म्हणाले की, पेटीएममध्ये प्रत्येक नवीन फीचर तयार करण्यासाठी आमची टीम अनेक तास घालवते आणि अगदी लहानात लहान तपशीलाचा देखील विचार करते. आमच्या टीयर 2 आणि टीयर 3 मधील ग्राहकांचा हिस्सा 40 टक्क्यांपासून वाढून ती 70 टक्क्यांपर्यंत जाण्याची अपेक्षा करीत आहोत. तसेच पेमेंट आणि वाणिज्य अधिक सर्वसमावेशक करणे हे आमचे ध्येय असल्याचेही ते यावेळी म्हणालेत.

Loading Comments