मोबाइल खिशात फुटला, भांडुपमधील घटना

  • मुंबई लाइव्ह टीम & अतुल चव्हाण
  • सिविक

चार्जिंगला लावलेल्या मोबाइल फोनचा स्फोट होऊन त्यात वापरकर्ता जखमी झाल्याच्या घटना आपण अनेकदा प्रसार माध्यमांमध्ये वाचल्या वा पाहिल्या असतील. अशीच एक घटना मंगळवारी दुपारी भांडुपमध्ये घडली. रेस्टाॅरंटमध्ये बसलेल्या एका व्यक्तीच्या खिशातील मोबाइलचा अचानक स्फोट झाला अन् एकच धावपळ उडाली. सुर्दैवाने या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

बघा, 'असा' फुटला खिशात मोबाइल

नेमकं काय झालं?

भांडुप रेल्वे स्थानकाजवळील बगीचा रेस्टाॅरंटमध्ये संबाधित व्यक्ती दुपारी २ वाजेच्या सुमारास जेवण्यासाठी आली होती. जेवण करत असताना अचानक त्याच्या शर्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलमधून धूर निघायला लागला आणि क्षणाधार्थ मोबाइलने पेटही घेतला. त्याने लगेच मोबाइल काढून खाली फेकला असता मोबाइलचा स्फोट झाला.

किरकोळ दुखापत

या घटनेनंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. या घटनेत मोबाइलधारकाच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली आणि त्यांचा शर्ट जळाला, अशी माहिती बगीच्या हॉटेलचे मालक नागराज यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.

फोन कुठल्या कंपनीचा?

हा प्रकार पाहून आजूबाजूचे ग्राहकही घाबरून पळत सुटले. हा मोबाइल फोन कोणत्या कंपनीचा होता हे कळू शकलेलं नाही. मात्र फोन वापरताना काळजी घ्यावी आणि वापर करत नसताना तो शरीरापासून दूर ठेवावा, हेच यातून लक्षात येत आहे.


हेही वाचा-

बिटकाॅईन घोटाळ्याप्रकरणी राज कुंद्राला समन्स

माटुंग्यात तीन बोगस पोलिसांना अटक


पुढील बातमी
इतर बातम्या