COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

माटुंग्यात तीन बोगस पोलिसांना अटक

शाळेच्या १०० मीटर परिसरात असणाऱ्या पान टपरीवाल्यांना ठाणे गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचं सांगून ठकवणाऱ्या तिघांना माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे.

माटुंग्यात तीन बोगस पोलिसांना अटक
SHARES

शाळेच्या १०० मीटर परिसरात असणाऱ्या पान टपरीवाल्यांना ठाणे गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचं सांगून ठकवणाऱ्या तिघांना माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही आरोपी सुशिक्षित असून त्यामध्ये एका माजी नगरसेवकाच्या मुलाचा समावेश आहे. हर्षल भाटकर (३१), दुर्गेश गुप्ता (५१) आणि प्रकाश प्रल्हाद ठोंबरे (३६) अशी तिघांची नावे आहेत.


कुठलं प्रकरण?

धारावीच्या ९० फीट रोडवर राहणारे तक्रारदार आशिष पांडे यांची माटुंगाच्या भंडारकर रोडवर बनारसी पानभंडार नावाची पानपट्टी आहे. रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे पांडे त्यांच्या पान टपरीवर बसले होते. त्यावेळी आरोपी हर्षल भाटकर, दुर्गेश गुप्ता आणि प्रकाश प्रल्हाद ठोंबरे हे तिघे पांडे यांच्या टपरीवर आले. या तिघांनी पांडेला स्वत:ची ओळख ठाणे गुन्हे शाखेचे अधिकारी अशी करून दिली.


लाचेचा पहिला हप्ता दिला

तसंच "तू टपरीवर तंबाखूजन्य पदार्थ विकतो. ते ही शाळा आणि काॅलेजच्या १०० मीटर परीसरात त्यामुळे आम्ही तुझ्या टपरीवर कारवाई करण्यासाठी आलो आहे. कारवाई होऊ नये, अशी तुझी इच्छा असेल, तर आम्हाला १५ हजार रुपये दे" असं तिघांनी त्याला धमकावलं. घाबरलेल्या पांडेने तडजोडीनंतर ६ हजार रुपये देण्याची तयारी दाखवली. त्यानुसार पांडेने लाचेचा पहिला हप्ता ३ हजार ७०० रुपये त्या तिघांना दिले.


तिघांवर संशय

मात्र पांडेला तिघांवर संशय आल्याने त्याने माटुंगा पोलिस ठाण्यातील ओळखीच्या अधिकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी पोलिसांनी पांडेला त्याची फसवणूक झाल्याचं सांगितलं. सोबतच तिन्ही आरोपींना लाचेचा दुसरा हप्ता स्वीकारण्यासाठी बोलवण्यास सांगितलं. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब काकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजयकुमार अंबरगे, जयवंत ढंबाळे यांच्यासोबत पोलिस उपनिरीक्षक प्रदीप तुपे व पूनम भोई यांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला.


'असं' घेतलं ताब्यात

तिन्ही आरोपी पैसे घेण्यासाठी आल्यावर पोलिसानी त्यांना रंगेहाथ अटक केली. पोलिस चौकशीत हर्षल भाटकर दादरच्या उच्चभ्रूवस्तीत राहणारा असून त्याचा फूड एजन्सीचा व्यवसाय आहे. तर दुर्गेश गुप्ता हा माहिम परिसरात राहणारा असून तो प्राँपर्टी एजंटचं काम करतो.

तर तिसरा आरोपी प्रकाश प्रल्हाद ठोंबरे याचा टूर्स व ट्रव्हल्सचा व्यवसाय असून तो शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचा मुलगा असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या तिघांना पोलिसांनी भा.द.वी कलम १७०, ४२०, ३४ नुसार गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब काकड यांनी दिली.हेही वाचा-

व्हिजेटीआयच्या शिक्षकाला अखेर अटक

भोईवाड्यातील मटका केंद्रांवर पोलिसांचीच मेहरबानी?Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा