भोईवाड्यातील मटका केंद्रांवर पोलिसांचीच मेहरबानी?


भोईवाड्यातील मटका केंद्रांवर पोलिसांचीच मेहरबानी?
SHARES

परळच्या भोईवाडा परिसरातील मटका केंद्रावर पोलिसांच्या कारवाईनंतरही तेथे मटक्याचा धंदा राजरोसपणे सुरू होता. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी कान उपटल्यानंतर भोईवाडा पोलिसांनी मूक संमती दिल्यानंतर त्या मटका केंद्रावर अखेर अंमली पदार्थ विरोधी पथाकाचे पोलिस उपायुक्त शिवदीप लांडेंनी धडक कारवाई केली. त्यानंतर या मटका केंद्रावरून पोलिसांनी डझनभर जुगाऱ्यांवर गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली आहे. यामुळे त्या भोईवाड्यातील मटका केंद्रांवर पोलिसांचीच मेहरबानी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


तरीही पोलिसांचं दुर्लक्ष

परळच्या केईएम रुग्णालयासमोरील गल्लीत राजरोसपणे मटका खेळला जात असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सायनचे सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र त्रिवेदी यांनी या मटका केंद्रावर कारवाई केली. परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत मुंबई पोलिस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका सभेत भोईवाडा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताकीद देत जाहिररित्या कान उपटले होते. मात्र तरीही आयुक्तांच्या ताकिदीकडे दुर्लक्ष करत केईएममधील मटका केंद्र अवैधरित्या सुरूच होते. 


दिवसाला 9 लाखांची कमाई

या मटका केंद्रावरून दिवसाला 9 लाखांची कमाई होत होती. तर आठवड्याला कोट्यावधी रुपयांचा उलाढाल होत होता. या अवैध धंद्यांची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांना मिळाली. त्यानुसार लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी भालेराव यांच्या पथकाने कारवाई करत डझनभर जुगाऱ्यांकडून मुद्देमाल हस्तगत केला आणि त्यांना अटक केली.


या ठिकाणी केली कारवाई

परळच्या त्या मटका केंद्रावर कारवाई करणे तितकंसं सोपे नव्हतं. कारवाईसाठी निघालेल्या पोलिसांची माहिती क्षणार्धात त्या जुगाऱ्यांपर्यंत पोहचायची. विशेष म्हणजे पोलिसांनी कारवाई जरी केली, तरी ग्राहकांना पळण्यासाठी या जुगाऱ्यांनी छुपा दरवाजा मटका केंद्रावर बनवला होता. त्यामुळे पोलिस आले तरी ते मागच्या दरवाजाने पळून जायचे. त्यामुळे कारवाई करण्यासाठी पोलिसांनी त्या संपूर्ण परिसराची पाहणी केली होती. कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी साध्या वेशात मटका केंद्राची पाहणी केली होती. यासह दादरच्या प्लाझा सिनेमा मागील भाजी मार्केटमध्ये चालणाऱ्या मटक्यावर पोलिसांनी एकाच वेळी कारवाई केली आहे.


आठवड्यात कोट्यावधी रुपयांची उलाढाल

पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर तपासात दिवसाला या मटका केंद्रावरून अंदाजे 9 लाख रुपयांचा जुगार खेळला जात असल्याचं उघडकीस आलं असून आठवड्याला अंदाजे कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असल्याची धक्कादायकबाब उघडकीस आल्याने या प्रकरणाची व्याप्ती किती आहे. हे लक्षात येईल असं विशेष सूत्रांनी सांगितलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा