व्हिजेटीआयच्या शिक्षकाला अखेर अटक

माटुंगा पोलिसांनी ५ दिवसानंतर व्हिजेटीआयचे प्राध्यापक बी. जी. बेलापट्टी या शिक्षकाला याप्रकरणी अटक केली आहे. न्यायालयाने बेलापट्टी यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

व्हिजेटीआयच्या शिक्षकाला अखेर अटक
SHARES

काही दिवसांपूर्वी माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट (व्हिजेटीआय) या कॉलेजमधील विद्यार्थीनीचा गणित शिकवणाऱ्या शिक्षकाने विनयभंग केला होता. हे प्रकरण प्रसारमाध्यम आणि राजकीय मंडळींनी उचलून धरल्यानंतर माटुंगा पोलिसांनी संबंधित शिक्षकावर गुन्हा नोंदवला. अखेर माटुंगा पोलिसांनी ५ दिवसानंतर प्राध्यापक बी. जी. बेलापट्टी या शिक्षकाला याप्रकरणी अटक केली आहे. न्यायालयाने प्राध्यापक बी. जी. बेलापट्टी यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


नेमकं प्रकरण काय?

व्हिजेटीआय कॉलेजमध्ये शिकणारी पीडित विद्यार्थीनी शुक्रवारी १८ मे रोजी गणित विषयाच्या जनरलवर सही घेण्याकरीता गणिताचे प्राध्यापक बी. जी. बेलापट्टी यांच्याकडे गेली होती. पण तिला जनरलवर लगेचच सही न देता दिवसभर ताटकळत ठेवलं. त्यानंतर संध्याकाळी ५.१५ च्या सुमारास सर्वजण घरी गेल्यानंतर आपल्या केबिनमध्ये बोलावून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.


कारवाईस टाळाटाळ

दरम्यान पीडित मुलीने, सोमवारी २१ तारखेला कॉलेजमधील महिला तक्रार निवारण समितीकडे लेखी तक्रार दाखल केली. परंतु या लेखी तक्रारीवर दुर्लक्ष करत काॅलेज प्रशासन मागील १० दिवसांपासून आम्हाला अशाप्रकारंचं कुठलंही पत्र मिळालं नसल्याचं सांगत होतं.


न्यायालयीन कोठडी

१० दिवस उलटूनही आपण केलेल्या तक्रारीवर कॉलेज प्रशासन दखल घेत नसल्याने पीडित मुलीने राजकीय संघटनेची मदत घेत, पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात २७ तारखेला गुन्हा नोंदवला. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी अखेर ५ दिवसांनी प्राध्यापक बी. जी. बेलापट्टी यांना अटक केली. या प्रकरणी प्राध्यापक बी. जी. बेलापट्टी यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब काकड यांनी दिली.



हेही वाचा-

आयपीएल बेटिंग: बुकी सोनू जलानला लावणार मकोका!

असा खेळला जातो क्रिकेट सामन्यांवर सट्टा!



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा