बिटकाॅईन घोटाळ्याप्रकरणी राज कुंद्राला समन्स

अमित भारद्वाजने gatbitcoin.com ही वेबसाइट बनवून अनेक जणांना कोट्यवधी रूपयांचा गंडा घातला अाहे. तब्बल २ हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा अाहे. राज कुंद्राचं नाव याअगोदरही अायपीएल सट्टेबाजीत समोर अालं होतं.

बिटकाॅईन घोटाळ्याप्रकरणी राज कुंद्राला समन्स
SHARES

बिटकाॅईन घोटाळ्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अंमलबजावणी महासंचालनालयने (ईडी) समन्स पाठवलं अाहे. राज कुंद्रा याला 'ईडी'ने मंगळवारी हजर राहण्यास सांगितलं अाहे.


मुख्य आरोपीला अटक

काही दिवसांपूर्वी या घोटाळ्यातील मुख्य अारोपी अमित भारद्वाज याला पुण्यामधून अटक करण्यात अाली होती. या घोटाळ्यामध्ये अाणखी मोठ्या घोटाळेबाजांचा समावेश असण्याचा संशय पोलिसांना अाहे.


२ हजार कोटींचा घोटाळा

अमित भारद्वाजने gatbitcoin.com ही वेबसाइट बनवून अनेक जणांना कोट्यवधी रूपयांचा गंडा घातला अाहे. तब्बल २ हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा अाहे. राज कुंद्राचं नाव याअगोदरही अायपीएल सट्टेबाजीत समोर अालं होतं. फिक्सिंगप्रकरणी कुंद्रावर क्रिकेटमध्ये अाजीवन बंदी घालण्यात अाली होती.

शिल्पा अाणि राज अायपीएल टीम राजस्थान राॅयल्सचे मालक होते. राज कुंद्राने पोलीस तपासात फिक्सिंगमधील सहभागाची कबुली दिली होती. यानंतर राजस्थान राॅयल्सवर २ वर्षांची बंदीही घालण्यात अाली होती.हेही वाचा-

लैंगिक अत्याचार करून तरुणाची हत्या

व्हिजेटीआयच्या शिक्षकाला अखेर अटकRead this story in हिंदी or English
संबंधित विषय