कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका देशाची आर्थिक राजधानी मुंबईला बसला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या एकूण रुग्णांच्या संख्येपैकी अर्ध्याहून अधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईत आतापर्यंत १ हजार २९८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आत्तापर्यंतची सर्वाधिक १६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, २१७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यामुळं मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार हॉटस्पॉट ठरवण्यात आले आहेत. या ठिकाणी कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनानं परिसर सील बंदही केला आहे. राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनानं मुंबईतील ४ विभाग हे अतिगंभीर म्हणून घोषित केले आहेत.
यापैकी जी साऊथमध्ये लोअर परेल आणि वरळीचा परिसर, ई वॉर्डमध्ये भायखळा, भायखळा फायर ब्रिगेड आणि आसपासचा भाग, डी वॉर्डमध्ये नाना चौक ते मलबार हिल परिसर आणि के वेस्ट वार्डात अंधेरी पश्चिमचा भाग यांचा समावेश आहे. आता हे चारही विभाग संपूर्णपणे सील करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आज एमई आणि एचई वार्डात कोरोना रुग्णांच्या संख्येत बरिच वाढ झाली आहे. त्यामुळे त्यावरही आरोग्य यंत्रणांचं विशेष लक्ष आहे.
वॉर्डनुसार रुग्ण
हेही वाचा -
जी दक्षिण विभागात २५० कोरोनाग्रस्त
मुंबईसहीत ८ जिल्हे रेड झोनमध्ये, पुढं काय होणार?