कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे - टास्क फोर्स

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत दैनंदिन रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ शशांक जोशी यांनी मंगळवार, ११ जानेवारी रोजी सांगितलं की, शहरातील कोविड-19 लाट कमी होत आहे.

"मुंबई ओमिक्रॉन निश्चितपणे कमी होत आहे, घाबरू नका. सावधगिरी बाळगा. आज ११ ते १२ हजार रुग्ण अपेक्षित आहेत. मास्क हे कोरोनापासून बचावाचं शस्त्र आहे. त्यामुळे मास्क घालणं आवश्यक आहे. सुरक्षित रहा,” जोशी यांनी ट्विट केलं आहे.

मुंबईत सलग तीन दिवस कोविड-19 चे २० हजारांहून अधिक रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली आहे. तथापि, दैनंदिन केस शहरात ३० टक्के आणि राज्यात अलीकडे जवळपास २५ टक्के इतकी घट झाली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) जारी केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत १३,६४८ पॉझिटिव्ह रुग्ण आणि पाच मृत्यूची नोंद झाली आहे.

दरम्यान, राज्यात सोमवारी ३३,४७० नवीन रुग्णांची नोंद झाली आणि ८ मृत्यूची नोंद झाली आहे. ज्यामुळे आतापर्यंत १,४१,६४७ मृत्यूंसह त्यांची संख्या ६९,५३,५१४ वर पोहोचली. अधिकाऱ्यांनी रुग्णांमध्ये घट होण्यामागील कारण कोविड चाचण्या कमी झाल्याचं सांगत आहेत.


हेही वाचा

मुंबईत दिवसभरात १० हजार ६९८ जणांनी घेतला बूस्टर डोस

मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या ६८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

पुढील बातमी
इतर बातम्या