Advertisement

मुंबईत दिवसभरात १० हजार ६९८ जणांनी घेतला बूस्टर डोस

आरोग्य कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर, सहव्याधी असणाऱ्यांसह ज्येष्ठांना ‘प्रिकॉशन’ बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईत दिवसभरात १० हजार ६९८ जणांनी घेतला बूस्टर डोस
(Representational Image)
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असून, दोन्ही डोस घेतलेल्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका सतर्क झाली आहे. त्यानुसार, आरोग्य कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर, सहव्याधी असणाऱ्यांसह ज्येष्ठांना ‘प्रिकॉशन’ बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, पहिल्या दिवशी १० हजार ६९८ जणांना डोस देण्यात आला. यामुळे ‘प्रिकॉशन डोस’च्या माध्यमातून ’सुरक्षा कवच’ मिळाले आहे.

या मोहिमेत सुमारे १३ लाख लाभार्थ्यांना डोस देण्यात येणार आहे. पालिका, सरवारी आणि खासगी अशा सुमारे ४५० केंद्रांवर हा डोस देण्यात येत आहे. यामध्ये लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतल्याच्या तारखेपासून ९ महिने किंवा ३९ आठकडे झाले असतील त्यांना प्रिकॉशन डोस घेता येणार आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दररोज तब्बल २० ते २५ टक्के रुग्णवाढ होत आहे. २१ डिसेंबर अखेरपासूनच ही रुग्णवाढ सुरू झाली आहे. ४ जानेवारी रोजी १० हजार ८६० इतके रुग्ण नोंदवले गेले होते. तर ५ जानेवारी रोजी १५ हजारांवर तर १६ जानेवारी रोजी आणखी ५ हजारांची वाढ होऊन रुग्णसंख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला. यानंतरह सलग ४ दिवस रुग्णसंख्या २० हजारांपर्यंत राहिली होती. मात्र रुग्णंख्येत मोठी घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा