Advertisement

मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या ६८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसीएल) कार्यालयातील ६८ जणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या ६८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. शिवाय दिवसेंदिवस बाधितांची संख्याही वाढत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. अशातच मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसीएल) कार्यालयातील ६८ जणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

'एमएमआरसीएल'मधील ३५० कर्मचाऱ्यांची ६ जानेवारीला करोना चाचणी करण्यात आली होती. त्यामधील ६८ जण बाधित झाल्याचे समोर आले आहे. बाधितांमध्ये वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ कर्मचारी या सर्वांचा समावेश आहे. 

'एमएमआरसीएल'ने बाधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे. दरम्यान, एमएमआरडीए कार्यालयातीलही अनेक कर्मचारी बाधित झाले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सरकारी कार्यालयातील कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा