आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या सिटी सेंटर मॉलची पालकमंत्र्यांकडून पाहणी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलची मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी दुपारी पाहणी केली. शिवाय ही आग नेमकी कशामुळे लागली, हे शोधून काढण्यासाठी संबंधीत दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देखील अस्लम शेख यांनी दिले आदेश. यावेळी त्यांच्यासोबत अमिन पटेल देखील उपस्थित होते. 

मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉलमध्ये गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास भीषण आग लागली होती. मागील २० तासांपासून अग्निशमन दलाकडून येथील आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, अद्याप आग आटोक्यात आलेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून मॉलमध्ये अडकलेल्या ४०० हून अधिक नागरिकांची सुखरुप सुटका केली. तर आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे.

हेही वाचा- नागपाड्यातील मॉलला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे २ जवान जखमी

दरम्यान एक दिवस आधीच दादरच्या प्रसिद्ध अगरबाजारातील एका चिकन स्टोरेज शॉपच्या दुकानाला आग लागली होती. बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही आग लागली होती या आगीत दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर त्याआधी दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये एका क्रॉकरीच्या मार्केटमध्ये आगीचा भडका उडाला होता. ही आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या कर्मचार्‍यांना तब्बल २ दिवस लागले होते. मुंबईत सातत्याने ठिकठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडतच आहेत.

हेही वाचा - दादरमधील अगरबाजार परिसरात मोठी आग
पुढील बातमी
इतर बातम्या