Advertisement

नागपाड्यातील मॉलला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे २ जवान जखमी

या आगीत मोठ्या प्रमाणात मॉलचं नुकसान झालं असून, अग्नीशमन दलाचे २ जवानही जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

नागपाड्यातील मॉलला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे २ जवान जखमी
SHARES

मुंबईतील नागपाडा येथील सिटी सेंटर मॉलला गुरूवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. एका दुकानात झालेल्या शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात मॉलचं नुकसान झालं असून, अग्नीशमन दलाचे २ जवानही जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मागील ११ तासांपासून ही आग नियंत्रणासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. मात्र अद्याप ही आग आटोक्यात आलेली नाही.

मुंबई सेंट्रलजवळील बस स्थानकाच्या जवळ असलेल्या सिटी सेंटर मॉलला गुरूवारी रात्री ८.५३ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच घटनासाथळी अग्निशमन दलाच्या दवानांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. या आगीचं भीषण रुप पाहता अग्निशमन दलाकडून लेव्हल ५ ची आग असल्याचं जाहीर करण्यात आलं. अग्निशमन दलाचे २४ बंब आणि ११ टँकर घटनास्थळी दाखल झाले होते.

मॉलला लागलेली आग ही हवेमुळं संपूर्ण मॉलमध्ये पसरली. त्यामुळं सिटी सेंटर मॉलमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील दुकानही आगीच्या कचाट्यात सापडली आहेत. सिटी सेंटर मॉलला अगदी लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव या ५५ मजली इमारतीतील अंदाजे ३ हजार ५०० रहिवाशांचे जवळच्या मैदानामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून दिली जात आहे.

मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यामध्ये वाहतूक आणि इतर बाबींमध्ये मदतीसाठी पोलिसांना देखील तैनात करण्यात आले आहे. सिटी सेंटर मॉल आगीची तीव्रता लक्षात घेता बेलासिस रोड हा दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

सिटी सेंटर मॉल तळमजला अधिक तीन मजले स्वरूपाची इमारत आहे. या मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. या मजल्यावर मोबाईल, प्रिंटर, स्टेशनरी, फर्निचर आणि इतर साहित्यांचे गाळे आहेत. या गाळ्यांना ही आग लागल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर ही आग तिसऱ्या मजल्यावर देखील पसरली असल्याचं लक्षात आलं.

मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यामध्ये वाहतूक आणि इतर बाबींमध्ये मदतीसाठी पोलिसांना देखील तैनात करण्यात आले आहे. सिटी सेंटर मॉल आगीची तीव्रता लक्षात घेता बेलासिस रोडवरील दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी मार्ग बंद करण्यात आले आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा