Advertisement

दादरमधील अगरबाजार परिसरात मोठी आग

बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही आग लागली असून या आगीत दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

दादरमधील अगरबाजार परिसरात मोठी आग
SHARES

मुंबईतील अगरबाजार परिसरात आग लागल्याची माहिती समोर येत आहे. अगरबाजारातील चिकन स्टोरेज शॉपच्या दुकानाला आग लागली. बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही आग लागली असून या आगीत दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही शॉर्ट सर्किटमुळं आग लागली असं शेजारील दुकानदारान सांगितलं. तसंच, चिकन स्टोरेज शॉपच्या दुकानात २हुन अधिक मोठे रेफ्रिजरेटर होते. दरम्याम या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं.

आग ही एकाच दुकानाला लागल्यानं बाकीच्या इतर दुकानांचं नुकसान झालं नाही. त्याशिवाय या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, दुकानातील सर्व सामान जाळून खाक झालं. अगरबाजार परिसर हा वर्दळीचा असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. त्यामुळं अशी आग पुन्हा लागल्यास त्यांचा जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा