मुंबादेवी ट्रस्ट राज्य सरकारने ताब्यात घ्यावी - राज पुरोहित

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबादेवी मंदिर ट्रस्टकडून भाविकांच्या सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शिर्डी देवस्थान संस्थान, पंढरपूर देवस्थान आणि सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टप्रमाणे कोट्यवधी रुपयांची देणगी मिळत असलेल्या मुंबादेवी मंदिरावर सरकारी अंकुश यावा, अशी मागणी भाजपाचे आ. राज पुरोहित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी केली.

मुंबईतील मूळ मराठी बांधवांची कुलदेवता असलेले मुंबादेवी मंदिर हे गुजराती, मारवाडी, उत्तरभारतीय यांच्यासह अन्य भाषिकांचे श्रद्धास्थान आहे. घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाला लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या ट्रस्टकडे कोट्यवधी रुपयांची देणगी येते. परंतु, येथील भाविकांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ट्रस्टच्या गैरकारभाराविरोधात सोमवारी राज पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली मंदिराजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

या ट्रस्टचा कारभार पाहण्यासाठी सध्या आयएएस दर्जाचा अधिकारी नेमावा अशी मागणीही पुरोहित यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यातील शिर्डी देवस्थान, प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक देवस्थानकडे देणगीरूपात आलेल्या पैशाचा वापर हा समाजोपयोगी कामासाठी केला जातो, परंतु मुंबादेवी मंदिर ट्रस्टकडे करोडो रुपये गोळा होत असताना या देणगी रकमेचा उपयोग नेमका कशासाठी होतो हे अद्याप कळलेले नाही, अशी प्रतिक्रिया राज पुरोहित यांनी दिली आहे.


हेही वाचा - 

मी व्यापाऱ्यांचा आमदार - राज पुरोहित


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या