मी व्यापाऱ्यांचा आमदार - राज पुरोहित

  Mumbai
  मी व्यापाऱ्यांचा आमदार - राज पुरोहित
  मुंबई  -  

  ‘मी व्यापाऱ्यांचा आमदार असून, माझ्या तोंडात नेहमी व्यापारीच येतात. त्यामुळे मी व्यापाऱ्यांच्या हिताचे बोलणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य भाजपा आमदार राज पुरोहित यांनी गुरुवारी विधानसभेत केले. संजय घोडावत विद्यापिठ कोल्हापूर या विधेयकाच्या चर्चेत बोलताना त्यांनी हे व्यक्तव्य केली. नेहमीच आपल्या वक्तव्याने वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या राज पुरोहित यांनी गुरुवारी या विधेयकावर भाष्य केले. पुरोहित यांना तालिका योगेश सागर यांनी विद्यापीठाच्या विधेयकावरचर्चा असल्याचे समजावले. मात्र भाजपाच्या प्रतोदपदी निवड होत लाल दिवा मिळवलेल्या आमदार राज पुरोहित यांच्या या वक्तव्यावर विधानसभेतील आमदारांनी आक्षेप घेतला.

  त्यावेळी सावरासावर करत राज पुरोहित यांनी, "मी देशातील सगळ्यात मोठी बाजारपेठ असणाऱ्या कुलाबा विधानसभा मतदारसंघाचा आमदार असून, मला सतत व्यापाऱ्यांचे हित दिसत असते. त्यामुळे या विधयेकावर बोलताना मला व्यापाऱ्यांची बाजू मांडावी लागेल. यावेळी तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी, " तुम्ही फक्त व्यापाऱ्यांचे आमदार नसून, मतदार संघातील प्रत्येकाचे प्रतिनिधी आहात," असे सुनावले.

  त्यानंतर याच चर्चेत मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी सहभाग घेत, 'राज पुरोहित व्यापाऱ्यांच्या हिताचे बोलत आहेत. व्यापार हा पुरोहित यांच्या मतदारसंघात होत असला तरी व्यापारी आणि पुरोहित हे माझ्या मतदारसंघात राहतात. त्यामुळे ही चर्चा पुढे घेवून जावी लागेल,' असे सांगत राज पुरोहित यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.