Advertisement

...आणि राज पुरोहित यांचा पारा चढला!


...आणि राज पुरोहित यांचा पारा चढला!
SHARES

एकीकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या विजयाचा जल्लोष मुंबईच्या भारतीय जनता पार्टी कार्यालयात सुरू होता. मात्र त्याच वेळी भाजपा प्रतोद आणि आमदार राज पुरोहित यांचे रौद्ररूप दुसरीकडे पहायला मिळाले. आणि त्याला कारण ठरले एक पोस्टर!


...म्हणून संतापले पुरोहित!

राष्ट्रपती निवडणुकीत रामनाथ कोविंद देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. यामुळे मुंबई भाजपा कार्यालयात जल्लोषाचे वातावरण होते. यावेळीच नेमके मुंबई महापालिकेचे नगरसेवक नार्वेकर यांनी शुभेच्छा देणारे पोस्टर कार्यालयाच्या बाजूलाच लावले. या पोस्टरवर नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपाचे अध्यक्ष अशिष शेलार यांचे आणि नगरसेवक मकरंद नार्वेकरांचा फोटो होते. मात्र स्थानिक आमदार म्हणून राज पुरोहित यांचा फोटोच नेमका या पोस्टरवर नसल्यामुळे राज पुरोहित भलतेच खवळले. त्यांनी याचा जाब तात्काळ नगरसेवक मकरंद नार्वेकरांना विचारला.

'लोकल एमएलए' होके मेरा फोटो नही है! इसलिए तेरेको पार्टी में लिया क्‍या? तू जानता नहीं क्‍या राज पुरोहित को?' असा खडा सवाल करत भारतीय जनता पक्षाचे प्रतोद राज पुरोहित यांनी मुंबई महापालिकेतील भाजपाचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना झापले. मात्र यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष अशिष शेलार यांनी पुरोहित यांची समजूत काढल्याने नरिमन पाईंट येथे असलेल्या प्रदेश भाजपा कार्यालयाच्या बाहेरचा गोंधळ टळला.


पुरोहितांचे कार्यकर्तेही संतापले

यावेळी पुरोहित यांचे कार्यकर्ते ओरडून ओरडून विचारत होते, 'ये कौनसा कल्चर पार्टी मे लाना चाहते हो?' याचवेळी समयसूचकता दाखवत मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी हस्तक्षेप केला आणि ते राज पुरोहित यांना आपल्या गाडीत घेऊन गेले. दरम्यान, भाजपाच्या कार्यालयाबाहेर उपस्थित असलेल्या पुरोहित यांच्या कार्यकर्त्यांनी नार्वेकरांना चांगलेच धारेवर धरले होते.



हेही वाचा -

मरीन लाईन्स स्टेशनचे नाव मुंबादेवी करा: राज पुरोहित


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा