Advertisement

स्थानिक विद्यार्थ्यांना कॉलेजात राखीव जागा द्या - पुरोहित


स्थानिक विद्यार्थ्यांना कॉलेजात राखीव जागा द्या - पुरोहित
SHARES

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यानंतर आणखी एका भाजपा नेत्याने भाजपाला घरचा आहेर दिला आहे. भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत स्थानिक विद्यार्थ्यांना डावलले जात असल्याचा आरोप करत त्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.


स्थानिक विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक...

दक्षिण मुंबईतील स्थानिक विद्यार्थ्यांना कनिष्ठ आणि वरीष्ठ महाविद्यालयात प्राधान्याने प्रवेश द्यावा, अशी मागणी भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी केली आहे. सद्यस्थितीत महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेत स्थानिक विद्यार्थ्यांचा विचार होत नाही. त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांमध्ये 25 टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी पुरोहित यांनी केली आहे.


...तर आंदोलन करणार

या मागणीसाठी 4 जुलैला आझाद मैदान येथे सांकेतिक धरणे आंदोलन करण्याचा इशारा पुरोहित यांनी भाजपा सरकारला देत घरचा आहेर दिला आहे. गेली 3 वर्षे मागणी करुनही सरकार याची दखल घेत नसल्याने आपण हे पाऊल उचलल्याचे पुरोहित यांनी म्हटले आहे.


पुरोहित यांच्या मागण्या

  • दक्षिण मुंबईतील महाविद्यालयाच्या 5 किमी परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 टक्के जागा आरक्षित असावी
  • उपनगरीय गाड्यांचा प्रवास वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना दक्षिण मुंबईतील महाविद्यालयांत प्रवेश मिळावा
  • स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी दक्षिण मुंबईतील प्रत्येक महाविद्यालयात प्रवेश प्राथमिकता यादी वेगळी लावावी
  • स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी विशेष कोटा किंवा वर्ग वाढवावेत



हे देखील वाचा -

दहावी पुनर्परीक्षेच्या ऑनलाईन अर्जाला मुदतवाढ



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा