Advertisement

11वीच्या ऑनलाईन प्रवेशाला पुन्हा मुदतवाढ


11वीच्या ऑनलाईन प्रवेशाला पुन्हा मुदतवाढ
SHARES

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शिक्षण विभागाने अकरावी ऑनलाईन प्रवेशाची मुदत 29 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढवली आहे. ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.


'सर्व्हर अपडेट' केल्यानंतर सुरळीत

सुरूवातीच्या टप्प्यातील प्रवेशप्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आला नव्हता. त्यानंतर सर्व्हर अपडेट करण्यासाठी संपूर्ण एक दिवस मुंबईत ऑनलाईन प्रक्रिया थांबवण्यात आली. दुरूस्तीनंतर प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली.


याआधीही मुदतवाढ

याआधी अकरावी प्रवेश प्रक्रियेला 27 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आता ती 29 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. गुणवत्ता यादीसाठी भाग 1 आणि भाग 2 पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचेच अर्ज प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.


'माय स्टेटस' तपासा

ज्यांचे अर्ज अपूर्ण आहेत, अशा विद्यार्थ्यांचे गुणवत्ता यादीत नाव येणार नाही. विद्यार्थ्यांनी वेबसाईटवर 'माय स्टेटस' तपासून पहावे, असे आवाहन शिक्षण उपसंचालकांनी केले आहे.

एखाद्या विद्यार्थ्यांचा अर्ज अपूर्ण असला आणि त्याचे नाव गुणवत्ता यादीत न आल्यास त्यांची जबाबदारी शिक्षण मंडळाची नसेल, असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.


2016 मध्ये हा होता 'कट ऑफ'

कला – 94 % ते 80 %
वाणिज्य – 94 % ते 89 %
विज्ञान – 93.2 % ते 91%



हे देखील वाचा -

टीवायच्या निकालांसाठी 'टास्क फोर्स'



डाऊनलोड करा Mumbai live APP  आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा