एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी: मृतांचा आकडा २३ वर, रेल्वेविरोधात उच्च न्यायालयात याचिका

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

केईएम रुग्णालयात उपचार घेत असलेले गंभीर जखमी सत्येंद्र कनोजिया यांचा शनिवारी मृत्यू झाल्याने एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकामधील चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या २३ वर गेली आहे. एकाबाजूला रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या प्रकरणाच्या उच्च स्तरीय चौकशीचे आदेश दिलेले असताना प्रदीप भालेकर या मुंबईकराने रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या संदर्भात याचिकाकर्त्याचे वकील नितीन सातपुते यांनी सांगितले की, रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणारी चौकशी न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी तसेच दुर्घटनेस जबाबदार रेल्वे अधिकाऱ्याविरोधात कडक कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर ३ आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

२७ रुणांवर उपचार सुरूच

सद्यस्थितीत केईएम रुग्णालयात ३८ जखमींपैकी २७ जणांवर उपचार सुरू असून ११ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच मृतांपैकी १८ प्रवाशांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपविण्यात आल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. बगाडीया यांनी दिली.


हेही वाचा -

जबाबदार कोण? पाऊस, रेल्वे प्रशासन की प्रवासी?

'या' स्थानकांवरही होऊ शकते चेंगराचेंगरी


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या