आचारसंहितेचं कारण सांगत म्हाडाच्या अधिकाऱ्यांचा दैनंदिन कामांना नकार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यभरात होणाऱ्या निधानसभा निवडणुकीची २१ सप्टेंबरला आचारसंहिता लागू झाली. या आचारसंहितेदरम्यान राजकीय नेत्यांना पक्षकार्य करता येत नाही. त्यामुळं अनेक नेत्यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच काम उरकली. परंतु, राज्यभरात सध्या आचारसंहिता लागू असल्यानं मुंबई म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दैनंदिन कामं करण्यास नकार दिला आहे. त्यामुळं म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी या काळात कुठली कामं करावीत अथवा कुठली करू नये, याबाबत मार्गदर्शकपत्र जारी करण्याची मागणी मुंबई गृहनिर्माण मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी केली आहे.

क्षुल्लक कामांसाठी नकार

'२१ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेमुळं म्हाडा अधिकाऱ्यांनी दैनंदिन कामं करण्यास नकार दिल्यानं सामान्य जनता हैराण झाली आहे. याबाबत तक्रारी आपल्याकडं करण्यात आल्यानंतर याबाबत आपण म्हाडा उपाध्यक्षांना परिपत्रक जारी करण्याची मागणी केली आहे', असं म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांना लिहिलेल्या पत्रात लिहिण्यात आलं आहे.

आचारसंहितेचं कारण

म्हाडा अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचं कारण पुढे करत पूर्वी मंजूर झालेली विकास कामं तसंच काही रहिवाशांच्या मंजूर पत्रांबाबत काम करीत नसल्यामुळं सामान्यांना मोठा फटका बसत आहे. त्याशिवाय, राजकीय पक्ष, त्यांचे निवडणूक काळातील कार्यक्रम, उमेदवार आणि त्यांचा प्रचार यासाठी आचारसंहिता लागू आहे. कोणत्याही नवीन कामाची पायाभरणी, सुरुवात किंवा घोषणा आचारसंहितेत करायची नसते. नव्या कामांचं उद्घाटन करायचं नसतं.


हेही वाचा -

विधानसभा निवडणूक प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू

Vidhan Sabha Election 2019: मुंबईतील मतदारांच्या संख्येत घट


पुढील बातमी
इतर बातम्या