Advertisement

Vidhan sabha election 2019: मुंबईतील मतदारांच्या संख्येत घट

यंदा विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील मतदारांची संख्या कमी झाली आहे.

Vidhan sabha election 2019: मुंबईतील मतदारांच्या संख्येत घट
SHARES

राज्यभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताच सर्व पक्षीय नेते मतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रचार करत आहेत. परंतु, यंदा विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील मतदारांची संख्या कमी झाली आहे. मुंबईत १० मतदारसंघ असून, कुलाबा, मंबादेवी, मलबार हिल, भायखळा, शिवडी, वरळी, धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा आणि माहिम या मतदारांचा समावेश आहे.  

७.५६ टक्के कमी 

मिळालेल्या माहितीनुसार, २०११ साली केलेल्या जणगणनेच्या तुलनेत यंदाच्या जनसंख्येत ७.५६ टक्के कमी झाली आहे. या १० मतदारसंघाय २००९ साली एकूण २६,८७,१६६ मतदार होते. ही संख्या २०१४ साली कमी होऊन २४,५७,१९५ इतकी झाली. सध्याच्या आकडेवारीनुसार, या मतदारांची संख्या २५,०४,७३८ इतकी असून यामध्ये १३,६८,४८२ पुरूष मतदार आहेत तर, ११,३५,७७७ महिला मतदार आणि १०८ ट्रान्सझेंडर मतदार आहेत. विशेष म्हणजे मुंबईत एकूण १३८ असे मतदार आहेत ज्यांचं वय १०० वर्षांहून अधिक आहे. 

८ लाख नवे मतदार

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी राज्यभरात ८ लाख नवे मतदार सहभागी होणार आहे. राज्यभरातील मतदारांची संख्या ८,९४,४६,२११ इतकी आहे. यामध्ये नव्या मतदारांची संख्या १०,७५,५२८ इतकी होती परंतु, तपासणीतदरम्यान २,१६,२७८ मतदारांची नावं यादीतून हटविण्यात आली. त्यामुळं आता नव्या मतदारांची संख्या ८,५९,२५० इतकी असून यामध्ये २५९३ ट्रान्सझेंडर मतदार आहेत.हेही वाचा -

गणेशोत्सवानंतर नवरात्रौत्सवातही पावसाची शक्यता

शुक्रवारी दुपारी २ तास एक्स्प्रेस-वे बंदRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा