Advertisement

शुक्रवारी दुपारी २ तास एक्स्प्रेस-वे बंद

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सूचना फलक लावण्यासाठी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

शुक्रवारी दुपारी २ तास एक्स्प्रेस-वे बंद
SHARES

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सूचना फलक लावण्यासाठी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. शुक्रवारी दुपारी २ तासांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं या मार्गावर वाहतुककोंडी होऊ नये यासाठी वाहनचालकांनी कळंबोली येथून सुरू होणाऱ्या द्रुतगती महामार्गावर न जाता पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचं आवाहन महामार्ग पोलिसांनी केलं आहे.

सूचना फलक लावण्याचं काम

मुंबई-पुणे द्रृतगती मार्गावरील शेडुंग फाट्याजवळ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सूचना फलक लावण्याचं काम हाती घेतलं आहे. ओव्हरहेड गँन्ट्री प्रकारचं काम असल्यामुळं सूचना फलक लावण्यासाठी वाहनं बंद करावी लागणार आहेत. तसंच,  २ तासांत हे काम पूर्ण करून महामार्ग पुन्हा सुरळीत करण्याचं लक्ष्य रस्ते विकास महामंडळ आणि महामार्ग पोलिसांनी ठेवलं आहे.

जुन्या महामार्गाचा वापर 

शुक्रवारी दुपारी १२ ते २ या कालावधीत हे काम करण्यात येणार असल्यानं या कालावधीत खालापूरपर्यंतचा प्रवास वाहनांना द्रुतगती मार्गावरून करता येणार नाही. त्यामुळं वाहनचालकांनी कळंबोली सर्कल येथून जुन्या मुंबई पुणे महामार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.


हेही वाचा -

शरद पवार यांना चौकशीसाठी ईडी प्रवेश नाकारणार?

जितेंद्र आव्हाड धडकणार ईडी कार्यालयावर, परिसरात जमावबंदी लागू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा