Advertisement

जितेंद्र आव्हाड धडकणार ईडी कार्यालयावर, परिसरात जमावबंदी लागू

शरद पवार सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात जाणार आहे. तसंच, शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयाच्या परिसरात गर्दी करू नये, असं आवाहन केलं आहे.

जितेंद्र आव्हाड धडकणार ईडी कार्यालयावर, परिसरात जमावबंदी लागू
SHARES

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या चेअरमनसह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यात शरद पवार यांच्या नावाचाही समावेश आहे. या प्रकरणी चौकशीसाठी शरद पवार सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात जाणार आहे. तसंच, शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयाच्या परिसरात गर्दी करू नये, असं आवाहन केलं आहे. मात्र, शरद पवार यांनी आवाहन केलेलं असतानाही राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'आपण ईडीच्या कार्यालयावर कोणत्याही परिस्थितीत धडकणार', असल्याचं ट्विटरवरून स्पष्ट केलं आहे.

भावनिक ट्विट

'मी ठरल्याप्रमाणे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात जाणार आहे. त्यामुळं या परिसरात गर्दी करू नये’, असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना' केलं आहे. शरद पवार यांच्या या ट्विटनंतर जितेंद्र आव्हाड यांनी पवारांना टॅग करत एक भावनिक ट्विट केलं आहे.

आम्ही तुमचं नाही ऐकणार

'माफ करा साहेब, ह्या वेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचं नाही ऐकणार...महाराष्ट्र घडवताना तुम्हाला ज्या वेदना झाल्या आहेत. त्या आम्ही बघितल्या. कर्करोग, मांडीच्या हाडावर झालेली शस्त्रक्रिया, पायाला झालेली जखम...तरीही तुम्ही लढताय वयाच्या ७९ व्या वर्षी. हे सर्व तुम्ही आमच्यासाठी सोसलंय. त्यामुळं तुम्ही आम्हाला ईडीच्या कार्यालयावर जमू नका असे आदेश दिले असले तरी आम्हाला ते मान्य नाहीत. उद्यासाठी आम्हाला माफ करा’, असं म्हणत आव्हाड यांनी शुक्रवारी ईडी कार्यालयावर धडकणार असल्याचं स्पष्ट केलं.

जमावबंदीचे आदेश

जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्विटनंतर तसंच, खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी कुलाबा, कफ परेड, मरिन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.हेही वाचा -

PMC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, आरबीआयने वाढवली पैसे काढण्याची मर्यादा

अण्णांनी घेतली शरद पवारांची बाजू, म्हटले खोटे आरोप करणं चुकीचंRead this story in हिंदी
संबंधित विषय