PMC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, आरबीआयने वाढवली पैसे काढण्याची मर्यादा

PMC बँकेच्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. बँकेचे ग्राहक आता आपल्या खात्यातून १० हजार रुपये काढू शकतील. याआधी बँकेच्या खात्यातून केवळ १ हजार रुपयेच काढण्याचं बंधन होतं.

SHARE

PMC बँकेच्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. बँकेचे ग्राहक आता आपल्या खात्यातून १० हजार रुपये काढू शकतील. याआधी बँकेच्या खात्यातून केवळ १ हजार रुपयेच काढण्याचं बंधन होतं. यासंदर्भात रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने अधिसूचना काढली आहे. 

आरबीआयने नोटिफिकेशनमध्ये म्हटलं की, बचत आणि चालू खात्यातून बँकेच्या खातेदारांना १०,००० रुपये काढता येतील. यापूर्वी जर कोणी १,००० रुपये बँकेतून काढले असतील तर त्या खातेदारालाही नव्या मर्यादेप्रमाणे पैसे काढता येतील. आरबीआयच्या या आदेशानंतर बँकेचे ६० टक्के खातेधारक आपले पूर्ण पैसे काढू शकतील.

आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता असल्याने आरबीआय (RBI) ने PMC बँकेवर ६ महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. यामुळे बँकेला पुढील ६ महिन्यांमध्ये कुठलंही नवीन कर्ज देणं, नवीन ठेवी स्वीकारण्याला मनाई केली आहे. तसंच बँकेच्या खातेधारकांना देखील कुठल्याही खात्यातून १ रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यावर बंधन टाकलं होतं. परंतु आरबीआयने ही मर्यादा वाढवून १० हजार रुपये केली आहे. यामुळे चिंताग्रस्त झालेल्या पीएमसी बँक ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, रिझर्व्ह बँकेने बँकिंग परवाना रद्द केला नसला, तरी पुढील सूचना येईपर्यंत ‘पीएमसी’ बँकेला आर्थिक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवता येईल. रिझर्व्ह बँक परिस्थितीनुसार या दिशानिर्देशांमध्ये बदल करण्याबाबत विचार करू शकते. हेही वाचा-

'ह्या' कारणामुळे पीएमसीवर आले निर्बंध

PMC बँकेतून EMI भराल कसा? हे वाचून मिळू शकेल उत्तर...संबंधित विषय
ताज्या बातम्या