Advertisement

शरद पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाणारच, परिसरात जमावबंदी लागू


शरद पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाणारच, परिसरात जमावबंदी लागू
SHARES

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घोटाळ्याप्रकरणी शरद पवार शुक्रवारी २ वाजता स्वत:हून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर होणार आहेत. शरद पवार चौकशीकरीता हजेरी लावणार आहेत. मात्र त्यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुन्हा दाखल

शरद पवार यांच्याविरोधात शिखर बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाबरोबरच गुन्हा दाखल झाला. त्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, शरद पवार यांना अद्याप ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलेले नाही. त्याशिवाय, चौकशीसाठी कुणाला हजर करायचं हा तपास अधिकाऱ्याचा विशेषाधिकार असतो आणि त्यासाठी ठोस व विशिष्ट कारणं असतात, याकडं ईडी अधिकारी लक्ष वेधत आहेत.

अधिक चौकशी सुरू

सध्या ईडी या प्रकरणी अधिक पुरावे गोळा करीत असून, जबाबही नोंदवत आहेत. त्यामुळं जेव्हा आवश्यकता असेल, तेव्हा पवार यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचं ईडीकडून स्पष्ट करण्यात आल्याचं समजतं. दरम्यान, शरद पवार यांनी 'मी ठरल्याप्रमाणं सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात जाणार आहे. त्यामुळं या परिसरात गर्दी करू नये. कार्यकर्त्यांनी पोलिस व सरकारी यंत्रणांना सहकार्य करावं, असं आवाहन केलं आहे. हेही वाचा -

जितेंद्र आव्हाड धडकणार ईडी कार्यालयावर, परिसरात जमावबंदी लागू

ईडीची शाखा भाजप कार्यालयात सुरू करा, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची भाजपवर टीकासंबंधित विषय
Advertisement