Advertisement

गणेशोत्सवानंतर नवरात्रौत्सवातही पावसाची शक्यता

रविवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रौत्सवादरम्यानही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गणेशोत्सवानंतर नवरात्रौत्सवातही पावसाची शक्यता
SHARES

मुंबईसह उपनगरात गुरुवारी संध्याकाळी जोरदार पावसानं हजेरी लावली. त्यानंतर काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसानं शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा हजेरी लावली. दरम्यान, शुक्रवारी मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, रविवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रौत्सवादरम्यानही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

नवरात्रौत्सवात पाऊस

मुंबईत गणेशोत्सवातील १० दिवस मुसळधार पाऊस पडल्यानं मुंबईकरांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. मात्र, लगेचच सुरू होणाऱ्या नवरात्रौत्सवात धमाल करालया मिळेल अशी आशा मुंबईकरांना होती. परंतु, नवरात्रोत्सवातही मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नवरात्रौत्सवात सुरुवातीचे काही दिवस गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, रात्रीच्या वेळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पावसाची हजेरी

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात गुरुवारी दुपारी ४.३० नंतर पावसानं हजेरी लावली. मुंबई शहर, नवी मुंबई आणि ठाणे येथे काही ठिकाणी जोरदार सरींनी उपस्थिती लावली. गुरुवारी संध्याकाळी .३० वाजेपर्यंत कुलाबा इथं १४.० पावसाची नोंद झाली आहे. तसंच, सांताक्रूझ इथं ०.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.



हेही वाचा -

शुक्रवारी दुपारी २ तास एक्स्प्रेस-वे बंद

शरद पवार यांना चौकशीसाठी ईडी प्रवेश नाकारणार?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा