पाणीपट्टीच्या अभय योजनेला पालिकेकडून मुदतवाढ, मिळणार विशेष सूट

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत (mumbai) पाणीपट्टी थकबाकीदारांची संख्या मोठी आहे. या थकबाकीदारांकडून पाणीपट्टी (water tax) वसूल करण्यासाठी मुंबई महापालिकेने (mumbai municiple corporationअभय योजना (Abhay Yojana) सुरू केली आहे. या अभय योजनेची मुदत आता मुंबई महापालिकेने ३ महिन्यांसाठी वाढवली आहे. याअंतर्गत  १५ फेब्रुवारी ते १५ मेपर्यंत थकबाकीदारांना पाणीपट्टी भरल्यास विशेष सूट देण्यात येणार आहे.

जकात कर बंद झाल्यानंतर मालमत्ता कर (Property tax) हा पालिकेचा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. मात्र, ५०० चौ.फुटांच्या मालमत्तांना कर माफ केल्यामुळे महापालिकेचं आर्थिक गणित बिघडलं आहे.  आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास अवघे दीड महिने राहिले आहेत. मात्र, जेवढे लक्ष्य ठेवले होते तेवढा मालमत्ता कर वसूल झाला नाही. त्यामुळे पालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानंतर पालिकेने पाणीपट्टी (water tax) थकबाकीदारांकडे आपला मोर्चा वळविला आहे. पाणीपट्टी वसूल करण्यासाठी पालिकने अभय योजना सुरू केली आहे. 

मुंबईतील विविध शासकीय, निम शासकीय आणि काही खासगी कार्यालयांनी मोठी पाणीपट्टी (water tax)  थकवली आहे. विविध कार्यालयांकडून महापालिकेला दीड हजार कोटी रुपये येणे आहेत. ही रक्कम वसूल करणे, तसेच पाणीपट्टी नागरिकांनी वेळेत भरावी, यासाठी अभय योजना Abhay Yojana) राबविण्यात आली. मात्र, योजनेची मुदत संपत आली असल्याने पालिकेने आता अभय योजनेची मुदत वाढवली आहे. 

जलदेयकातील जल आकार, मलनिस्सारण आकार आणि जलमापक भाडे यांचे एकरकमी अधिदान करावे, तसेच अभय योजनेच्या कालावधीत आकारण्यात आलेली पाणीपट्टी १५ मे २०२० पूर्वी भरणाऱ्या थकबाकीदाराला या योजनेचा लाभ मिळेल. अधिक माहितीसाठी आपल्या संबंधित विभाग कार्यालयातील सहायक अभियंता (जलकामे) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.


हेही वाचा -

शास्त्रीनगर नाल्यावरील २०२ अनधिकृत बांधकामं पालिकेने तोडली

३ तासाच्या चौकशीनंतर उर्वशी चुडावालाला पोलिसांनी सोडले


पुढील बातमी
इतर बातम्या