Advertisement

शास्त्रीनगर नाल्यावरील २०२ अनधिकृत बांधकामं पालिकेने तोडली

अनधिकृत बांधकामांवर (Unauthorized construction) कारवाई करण्याची धडक मोहीम मुंबई महापालिकेने (mumbai municiple corporation) हाती घेतली आहे. मागील ४ दिवसांत पालिकेने अनेक ठिकाणची अनधिकृत बांधकामं उद्धवस्त केली आहेत.

शास्त्रीनगर नाल्यावरील २०२ अनधिकृत बांधकामं पालिकेने तोडली
SHARES

अनधिकृत बांधकामांवर (Unauthorized construction) कारवाई करण्याची धडक मोहीम मुंबई महापालिकेने (mumbai municiple corporation)  हाती घेतली आहे. मागील ४ दिवसांत पालिकेने अनेक ठिकाणची अनधिकृत बांधकामं उद्धवस्त केली आहेत. गोरेगाव (Goregaon) मधील शास्त्रीनगर नाल्याच्या (Shastrinagar Nala) रुंदीकरणात अडथळा ठरत असलेली २०२ अनधिकृत बांधकामे पालिकेने तोडली आहेत. ही बांधकामं हटवल्याने आता शास्त्रीनगर नाल्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

ब्रिमस्टोवॅड प्रकल्पात (Brimstowad project) शास्त्रीनगर नाल्याचं (Shastrinagar Nala) रुंदीकरण होणार आहे. मात्र, नाल्याच्या बाजूला असलेल्या अतिक्रमणांमुळे रुंदीकरण करता येत नव्हते. याशिवाय या अतिक्रमणांमुळे पावसाळ्यात गोरेगाव पश्चिम भागातील मोतीलाल नगर, शास्त्रीनगर, सिद्धार्थ नगर आणि आसपासचा परिसर जलमय होत होता. अनेक घरांमध्ये पाणी शिरत होते. लिंक रोड ते मालाड खाडी दरम्यानच्या १ हजार ४७६ फूट लांबीच्या शास्त्रीनगर नाल्याच्या पात्राची रुंदी ९ फूट आहे. ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाअंतर्गत नाल्याची रुंदी ४५ फूट करण्यात येणार आहे. नाल्याच्या उत्तरेला २०२, तर दक्षिणेला ३५८ अशी एकूण ५६० बांधकामे आहेत. त्यामुळे रुंदीकरणात अडथळा येत असल्याने पालिकेने उत्तरेची २०२ बांधकामे हटविण्याची कारवाई १० फेब्रुवारी रोजी सुरू केली होती. नाल्याच्या उत्तरेची २०२ बांधकामे हटविण्याची कारवाई पालिकेने १० फेब्रुवारी रोजी सुरू केली होती. ही कारवाई बुधवारी पूर्ण झाली आहे.

अनधिकृत बांधकामं हटवल्याने आता नाल्याची रुंदी २२ फूट करणे पालिकेला शक्य होणार आहे. तसंच  गोरेगाव पश्चिम भागातील सखल भागांत पावसाचे पाणी साचण्याचे प्रकार कमी होतील. रुंदीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे.  पुढील टप्प्यात शास्त्रीनगर नाल्याच्या दक्षिणेकडील ३५८ बांधकामे हटविण्यात येणार आहेत. त्यानंतर  नाल्याची रुंदी ४९ फूट करणे शक्य होणार आहे. कारवाईवेळी ४० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता.



हेही वाचा -

कांदिवलीत सिलेंडरचा स्फोट, भीषण आगीत ९ जण होरपळले

३ तासाच्या चौकशीनंतर उर्वशी चुडावालाला पोलिसांनी सोडले




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा