३ तासाच्या चौकशीनंतर उर्वशी चुडावालाला पोलिसांनी सोडले

उर्वशीची पोलिसांनी ४ तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तिला जाऊ दिले.

३ तासाच्या चौकशीनंतर उर्वशी चुडावालाला पोलिसांनी सोडले
SHARES

देशद्रोही शर्जिल इमाम याच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या उर्वशी चुडावालाला मंगळवारी पोलिसांना शरण आली. न्यायमूर्ती एस.के.शिंदे यांनी उर्वशीचा अटकपूर्व जामीन २५ हजाराच्या जातमुचलक्यावर मंजूर केला आहे. अर्ज मंजूर करताना उर्वशीने १२ व १३ फेब्रुवारी रोजी पोलिस ठाण्यात हजेरी लावून सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. उर्वशीची पोलिसांनी ४ तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तिला जाऊ दिले. 

  हेही वाचाः- वजन कमी करण्याच्या गोळ्यांनी तरुणीचा मृत्यू

 मुंबई प्राइड सॉलिडेटरी गॅदरींग निमित्ताने काही विद्यार्थ्यी १ फेब्रुवारी रोजी आझाद मैदान येथे जमले होते. त्यांचे नेतृत्व उर्वशि चुडावाला करित असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. जमलेल्या विद्यार्थ्याॆनी सीएए, आणि एनआरसी विरोधात घोषणाबाजी केली. त्याच वेळी त्यांनी जेएनयूचा विद्यार्थी नेता शर्जील इमामच्या समर्थनार्थ घोषणा ही दिली. या घटनेची गंभीर दखल विरोधीपक्षासह इतर सामाजिक संघटनांनी घेतली. विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणांचा व्हिडिओ  त्याच्या ट्विटर अकाऊन्टवरून शेअर केला. तसेच याबाबत सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली.

 हेही वाचाः- मुंबईत २४ तासात पतीने पत्नीची हत्या केल्याच्या दोन घटना

या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी अखेर विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणाऱ्या उर्वशी चुडावालासह५१ जणांवर  १२४ अ (राजद्रोह), १५३ ब, ५०५आणि३४ भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवला. या घटनेनंतर उर्वशी फरार होती. तिने अटकपूर्व जामीनसाठी न्यायालयात अर्ज केला होता. मंगळवारी या अटकपूर्व जामीनाला न्यायालयाने मंजूरी दिली. मात्र न्यायालयाने उर्वशीला मुंबईव ठाण्याबाहेर जाता येणार नाही. तसेच १२ व १३ फेब्रुवारी रोजी पोलिस ठाण्यात हजर होण्यास सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी उर्वशी आझाद मैदान पोलिस ठाण्यात हजर झाली होती.  त्यावेळी पोलिसांनी तिची ४ तास कसून चौकशी केली. चौकशीनंतर पोलिसांनी उर्वशीला जाऊ दिले.  

त्या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

० उर्वशी चुडावालाला मुंबई उच्च न्यायालयाने तुर्तास दिलासा

० न्यायमूर्ती एस.के.शिंदे यांनी उर्वशीचा अटकपूर्व जामीन २५ हजाराच्या जातमुचलक्यावर मंजूर केला 

० उर्वशीने १२ व १३ फेब्रुवारी रोजी पोलिस ठाण्यात हजेरी लावून सहकार्य करण्याचे निर्देश

०उर्वशीने मुंबई व ठाण्याबाहेर न जाण्याचे आदेश 

०देशद्रोही शर्जिल इमाम याच्या समर्थनार्थ दिल्या होत्या घोषणा

 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा