मुंबईत २४ तासात पतीने पत्नीची हत्या केल्याच्या दोन घटना

पवई आणि विक्रोळी या दोन्ही घटनांमध्ये पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे.

मुंबईत २४ तासात पतीने पत्नीची हत्या केल्याच्या दोन घटना
SHARES

मुंबईत २४ तासात पवई (powai) आणि विक्रोळी (vikroli) या ठिकाणी दोन हत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यातील एका घटनेत हुंड्यासाठी पतीनेच पतीची हत्या केली आहे. त्या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी विक्टर मोन्टेरो (३३) याला अटक केली आहे. तर पवईत अनोळखी व्यक्तींनी एका ६५ वर्षीय वृद्धेची हत्या केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी पोलिस (Mumbai police) अधिक तपास करत आहेत.  

हेही वाचाः- ​वजन कमी करण्याच्या गोळ्यांनी तरुणीचा मृत्यू​​​

विक्रोळी गाव येथे मृत एमा मेन्टोरो आणि रोलांड मेन्टोरो यांचा २०१७ मध्ये प्रेमविवाह झाला होता.मात्र, काही दिवसातच रोलांड एमाकडे पैशांची मागणी करू लागला. यासाठी तो तिला वारंवार मारहाणही करीत होता.दोन दिवसांपूर्वीदेखील त्याने एमाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीत तिच्या पोटातील पंथरी या भागाला जबर मार लागला होता. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावही होत होता. अखेर उपचारादरम्यान तिचा रविवारी मृत्यू झाला. याप्रकरणी एमाच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रोलांडवर हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

हेही वाचाः- ​जीएसटी बुडवण्यासाठी गुजरातच्या व्यापाऱ्याचा हा पराक्रम, खावी लागली तुरूंगाची हवा​​​

तर पवईच्या शिवशक्ती नगरमध्ये  शीला लाड आणि त्याचे पती अजित लाड हे मागील अनेक वर्षांपासून राहत आहेत. उतरत्या वयामुळे शीला या मागील अनेक दिवसांपासून आजारी होत्या.शीला यांच्या आजारपणामुळे अजित यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढतचं होता. यातूनच त्यांनी शीला यांची हत्या करून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान सोमवारी शीला यांच्या घराचे दरवाजा रविवारपासून बंद आढळून येत असल्यामुळे शेजाऱ्यांनी त्याची कडी ठोकावली. मात्र आतून कोणिही प्रतिसाद देत नव्हते. अखेर शेजाऱ्यांनी पोलिसांना पाचरण केले. पोलिसांनी दरवाजा तोडला असता. शीला या रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्या, त्यांच्या डोक्यावर, गळ्यावर आणि डाव्या मनगटावर धार धार शस्त्राचे वार आढळून आले. तर खोलीत अजित कुठेच आढळून आले नाहीत. पोलिसांना पंचनामा करताना. शीला यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळली. त्यात शिलायांचे आजारपण आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे पत्नी आणि मी जिवंन संपवत असल्याचे त्या चिठ्ठीत लिहिले होते.  त्यामुळे शीलाची हत्या अजितनेच केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अजित यांच्याबाबत अद्याप पोलिसांना कोणतिही माहिती मिळाली नसून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

हेही वाचाः- साकीनाका येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा