साकीनाका येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

मुलींना मिळणाऱ्या मिळकतीतून 30% रक्कम स्वत:ला ठेवून घ्यायचे.

साकीनाका येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
SHARES
इंटरनेटच्या माध्यमातून भारतीय तरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा 10 च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. इंटरनेटवर 'रिपब्लीकन डाॅट काॅम' या साईटवर स्वतःचा मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करून त्या द्वारे ही टोळी देहविक्रीचा गोरखधंदा करत होती. या छाप्यात पोलिसांनी 2 मुलींची सुटका केली असून जातून महादेव यादव (37) या एजंटला अटक केली आहे.

यादव आणि त्याचे सहकारी इंटरनेचयटवर मेसेज रिपब्लिकन डाँट काम साईटवर स्वत:चा क्रमांक द्यायचे. त्यानंतर उच्चभ्रूवस्तीतील व्यावसायिक आणि परदेशातील व्यावसायिकांना मुलींचे फोटो पाठवायचे. व्यावसायिकांनी निवडलेल्या मुलींना पैशांचे आमीष दाखवून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडायचे. ऐवढ्यावरच न थांबता त्यांना मुलींना मिळणाऱ्या मिळकतीतून 30% रक्कम स्वत:ला ठेवून घ्यायचे.

साकीनाका येॆथील हाँटॆलमध्ये हा गोरख धंदा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी  10 फेब्रुवारीला बोगस ग्राहक साकीनाका येथील हाॅटेल 'स्काय वे इन' येथे पाठवून यादवला अटक केली या कारवाईत पोलिसांनी एका 30 आणि 21 वर्षाच्या मुलीची सुटका केली.पोलिसांनी यादवकडून मोबाईल फोन, दोन सिमकार्ड आणि 17 हजार 500 रुपये हस्तगत केले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा