जीएसटी बुडवण्यासाठी गुजरातच्या व्यापाऱ्याचा हा पराक्रम, खावी लागली तुरूंगाची हवा

वस्तू व सेवा करात(जीएसटी) दोन कोटी 37 लाखांचा परतावा मागितल्याचे डीआरआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

जीएसटी बुडवण्यासाठी गुजरातच्या व्यापाऱ्याचा हा पराक्रम, खावी लागली तुरूंगाची हवा
SHARES
परदेशातूव खरेदी केलेल्या वस्तूंच्या किमती वाढवून दाखवत, महसूल बुडवणाऱ्या गुजरातच्या एका व्यावसायिकाचा महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने पर्दाफाश केला आहे. तेजस देशाई असे या व्यापाऱ्याचे नाव असून त्याला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.आरोपीने हे चढे भाव दाखवून वस्तू व सेवा करात(जीएसटी) दोन कोटी 37 लाखांचा परतावा मागितल्याचे डीआरआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे. 

मूळचा गुजरातच्या सूरत येथील रहिवाशी असलेला तेजसचा परदेशातून पुरातन वस्तूचा आयात व निर्यातीचा व्यवसाय आहे. तेजस भारतात आणणाऱ्या वस्तू चढ्या भावाने भारतात आणून खोटी बिल सादर करून भारताचा महसूल बुडवायचा. वस्तू निर्यात करून त्याच्या बदल्यात जीएसटीमध्ये परतावा मिळवणाऱ्या व्यावसायिकांबाबत डीआरआय तपास करत होती. त्या प्रकरणाचा मास्टरमाईंड देसाई असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी आणखी एका प्रकरणात आर्थर रोड तुरुंगात असल्याची माहिती डीआरआयला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे परवानगी मागून 1 फेब्रुवारीला देसाईची चौकशी केली होती. त्यावेळी वस्तू अंत्यंत चढ्या भावाने दाखवल्यामुळे चार कंपन्यांना त्याचा फायदा झाला. या सर्व त्याच्या कंपन्या असून त्यांच्या निर्यातीसाठी आवश्‍यक आयात-निर्यात क्रमांक(आयईसी) आरोपीच्या मित्राने दिले. 

या सर्व वस्तूंच्या खरेदीबाबतची पावत्या तो सादर करू शकला नाही. या सर्व वस्तू रोखीने खरेदी केल्याचे त्याने सांगितले. दरम्यान याप्रकरणी डीआरआयच्या तपासानुसार आरोपीने या निर्यातीच्या माध्यमातन दोन कोटी 37 लाखांचा जीएसटी परतावा मिळवला होता. या सर्व प्रकणाचा मास्टरमाईंट देसाई असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर डीआरआयने त्याला याप्रकरणी अटक केली. 
संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा