मुंबईत सध्यस्थितीत ढगाळ वातावरण अशून मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह राज्यभरात परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून, पुढील ३ ते ४ तास सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
बुधवार, गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, राज्यात मराठवाडाच्या व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात निर्माण झालेला अति कमी दाबाचा पट्टा ताशी १७ किलोमीटर वेगानं पुढं सरकत आहे. तसंच, बुधवार, गुरुवार दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
१४ ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी तसंच कोकण आणि गोवा, उत्तर कर्नाटकचा आतील भाग आणि मराठवाडा भागात मुसळधार किंवा अति मुसळधार पाऊस, कर्नाटकचा किनारी प्रदेश तसेच दक्षिण कर्नाटकचा आतला भाग इथं मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
केम्स कॉर्नर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
One Nation One Card: बेस्टमध्ये 'वन नेशन, वन कार्ड'च्या उपक्रमाला सुरुवात